पुण्यातील खून प्रकरणी कुख्यात गजा मारणेसह 20 जण निर्दोष



पुणे : सहकारनामा

पुणे शहर आणि परिसरात दबदबा निर्माण केलेल्या गजा उर्फ गजानन मारणे आणि त्याच्या टोळीची एका खून प्रकरणातून न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे.

पुण्यामध्ये टोळीयुद्ध भडकून अमोल बधे याचा दि. २९ नोव्हेंबर २०१४ ला सायंकाळी नवी पेठेजवळ असणाऱ्या कलावती मंदिरानजीक खून झाला होता.

यावेळी पोलिसांनी गावठी पिस्तुल, काडतुस आणि  कोयते असा मोठा शस्त्रसाठा जप्त केला होता. हा खून एखाद्या चित्रपटात दाखवतात तशा पद्धतीने अतिशय निर्दयपणे करण्यात आला होता. यात जवळपास अकरा कोयत्यांचा वापर करण्यात आला होता.

या खून प्रकरणी पोलिसांनी गजा मारणे आणि त्याच्या २० साथीदारांवर खूनचा गुन्हा आणि मोक्कानुसार कारवाई केलेली होती. हा गुन्हा विश्रामबाग पोलीस ठाणे येथे दाखल करण्यात आला होता.

या प्रकरणी विशेष मोक्का न्यायाधीशांनी या सर्वांची पुराव्याच्या अभावी त्यांच्यावर असणाऱ्या आरोपांतून निर्दोष मुक्तता करत असल्याचे जाहीर केले. 

या प्रकरणात आरोपींतर्फे अॅड सुधीर शहा, अॅड विजयसिंह ठोंबरे, अॅड विपुल धुशिंग व अॅड सिद्धार्थ पाटील यांनी बाजू मांडली.