हवेली ‛भाजप’चा महावितरण कार्यालयावर धडक ‛मोर्चा’



उरुळीकांचन : सहकारनामा (हनुमंत चिकणे)

शेतकऱ्यांची वीज बिले माफ झाली पाहिजे शेतकऱ्यांना फसवणाऱ्या ठाकरे सरकारचा  निषेध करत पूर्व हवेलीतील भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुक्रवारी (ता. ०५ ) वीज वितरण कार्यालयावर धडक मोर्चा आयोजित करण्यात आला होता. 

यावेळी वाढीव वीज बिलांची होळी करण्यात आली. तसेच ठाकरे सरकारच्या विरोधात “या महाविकास आघाडी  सरकारचे करायचे काय, खाली डोके वरती पाय”  “महाविकास आघाडी सरकार हाय हाय” अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. 

ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचे  वाढीव वीज बिल माफ न केल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन आणखी तीव्र करण्यात येणार असल्याचा इशारा हवेली तालुकाध्यक्ष सुनील कांचन यांनी दिला. 

यावेळी पश्चिम महाराष्ट्र व्यापारी आघाडीचे अध्यक्ष विकास जगताप, जिल्हा सरचिटनिस सुदर्शन चौधरी, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक कसबे, उरुळी कांचन शहराध्यक्ष श्रीकांत कांचन, गुरुनाथ मचाले, संतोष घोलप, गणेश चौधरी, दिपक कुंजीर, संतोष गायकवाड, अमित कांचन, शामराव लोंढे आदी उपस्थित होते. 

दरम्यान, ही महाविकास आघाडी सरकारची दडपशाही चालली असल्याचा आरोप सर्वच भाजपा पदाधिकाऱ्यांनी केला यावेळी आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी वीज वितरण  वीज बिलांची होळी करीत ठाकरे सरकारचा निषेध केला. लोणी काळभोर पोलिसांच्या देखरेखीखाली महावितरण उपविभाग उरुळी कांचनचे उप कार्यकारी अभियंता प्रदिप सुरवसे यांना भाजपा पदाअधिकाऱ्यांतर्फे शेतकरी वीजबिल माफीचे निवेदन देण्यात आले.  

यावेळी महावितरण  कार्यालयाबाहेर लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन चौधरी, पोलीस हवालदार सोमनाथ चितारे, सचिन पवार यांच्या उपस्थितीत बंदोबस्त ठेवण्यात आला होता.