दौंड : सहकारनामा
केडगाव ता.दौंड येथील जेष्ठ नागरिक पांडुरंगआप्पा साधू राऊत यांचे आकस्मिक निधन झाले ते 73 वर्षांचे होते. पांडुरंगआप्पा राऊत यांनी महाराष्ट्र विद्युत महामंडळामध्ये लाईनमन म्हणून सेवा काल पूर्ण केला होता.
त्यांच्यामागे पत्नी, त्यांची तीन मुले दत्तात्रय, दीनेश आणि संदीप (पिंटु) सूना, नातवंडे असा मोठा परिवार असून ते परिसरात स्पष्टवक्ते आणि मनमिळावू स्वभावाचे म्हणून प्रसिद्ध होते.
त्यांचा अत्यंवीधी केडगांव स्टेशन येथील स्मशान भूमी येथे दुपारी १:०० वाजता झाला. त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी तालुक्याचे आमदार राहुल कुल आणि परिसरातील हजारो नागरिक उपस्थित होते.