लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे)
लोणी काळभोर (ता. हवेली) ग्रामपंचायतच्या सरपंचपदी राजारामबापू काळभोर यांची तर उपसरपंचपदी ज्योती काळभोर यांची बिनविरोध निवड करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी अमित ननवरे यांनी दिली.
लोणीकाळभोर गावाचे सरपंच पद हे खुल्या प्रवागासाठी असल्याने यशवंत सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर गटाचे राजाराम बापू काळभोर व ज्योती काळभोर यांनी अनुक्रमे सरपंच व उपसरपंच पदासाठी अर्ज आले होते. यावेळी निकडणूक निर्णय अधिकारी अमित ननवरे यांनी सरपंचपदी राजारामबापू काळभोर तर उपसरपंचपदी ज्योती काळभोर यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा केली.
दरम्यान माधव काळभोर यांच्या नेतृत्वाखालील परीवर्तण पॅनेलच्या सरपंचपदाची घोषणा होताच, माधव काळभोर व विलास काळभोर समर्थकांनी गुलाल उधळुन व फटाके फोडुन आनंद साजरा केला. तर दुसरीकडे माधव काळभोर यांच्या हस्ते नवनिर्वाचित सरपंच राजारामबापु काळभोर व ज्योती काळभोर यांचा पुष्पगुच्छ देऊऩ सत्कार करण्यात आला.
यावेळी परीवर्तन पॅनेलचे प्रमुख माधव काळभोर, माजी जिल्हा परीषद सदस्य विलास काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, सीताराम लांडगे, साधना सहकारी बॅँकेचे सुभाष काशिनाथ काळभोर, बाजार समितीचे माजी संचालक शिवदास काळभोर, उद्योजक मनिष काळभोर यांच्यासह विद्यमान जिल्हा परीषद सदस्या सुनंदा शेलार, हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सनी काळभोर, लोणी काळभोर विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे माजी अध्यक्ष सुर्यकांत काळभोर, माजी उपसरपंच अण्णासाहेब काळभोर, योगेश काळभोर व ग्रामविकास अधिकारी दत्तात्रेय पवार आदी मान्यवर उपस्थित होते. तर सरपंच निवडीसाठी परीवर्तऩ पॅनेलचे योगेश प्रल्हाद काळभोर, भारत दत्तात्रय काळभोर, नागेश अंकुश काळभोर, सविता गिताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, ललिता राजाराम काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर , गणेश तात्याराम कांबळेव भारती राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके व संगीता सखाराम काळभोर हे अकरा सदस्य हजर होते.