‘टिकोजीरावांची’ मक्तेदारी संपुष्टात आल्याने सोशल मीडियावर थयथयाट | त्या संस्थेचा ना शेअर्स, ना सभासद.. तर हे होतं टिकोजीरावांच्या ‘फडफडीचं’ खरं कारण

दौंड : दौंड तालुक्यात एकमेव सहकारी साखर कारखाना असणाऱ्या भीमा पाटस कारखान्याबाबत आता रोज काही ना काही उलट-सुलट पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागल्या आहेत. या व्हायरल पोस्टमधून हा कारखाना सुरु झाल्यामुळे काहींना कारखाना बंद पडून आपला मानसिक विजय होण्याच्या आशा मावळल्याचे जाणवते. तर काहींच्या ‘त्या’ प्रकरणाला भांडवल करून दररोज नवीन खुसखुशीत लिहायचे अण आपला विजय झाला अश्या अविर्भावात मिरवायचे या कृतीवर पाणी फिरल्याने ‘आता काय करू’ अशी परिस्थिती झाली आहे.

या सर्व प्रकारामुळे हे टिकोजीराव भांबवले असून त्यांच्याकडून होणाऱ्या रोज-रोजच्या टिकांमुळे या कारखान्यात सध्या सेवेत असणारे कामगार आणि ऊस उत्पादक सभासद मात्र व्यथित होऊ लागले आहेत. कारण कारखाना जोमाने सुरु झाला आहे, ऊस उत्पादकांना चांगले पेमेंट मिळू लागले आहे, सेवेतील कामगारांचे पगार होत आहेत, निवृत्त कामगारांची देणी सुद्धा आता दिली जाणार आहेत त्यामुळे सहाजिकच टिकोजीरावांची बोलती बंद होणार आहे.

मात्र त्या संस्थेबाबत आणि या संस्थेच्या कामकाजाबाबत आम्हाला खूप कळते असा अविर्भाव आणून वाट्टेल तशी टिका, टिप्पनी सोशल मीडियावर पोस्ट करायची अण स्वतःचे उर बडवून घ्यायची सवय असणाऱ्या सोशल मीडिया बहाद्दर टिकोजीरावांना आता कारखान्याचे सभासद प्रश्न विचारू लागले असून, या संस्थेबाबत जर हे इतकी आस्था दाखवत असतील तर मग ही संस्था ज्यावेळी अडचणीत होती त्यावेळी टिका करण्याव्यतिरिक्त तुमचे योगदान काय होते, उठ सुठ कारखान्यावर लिहिणाऱ्या सोशल मीडिया बहाद्दर टिकोजीरावांचा या संस्थेत शेअर्स होता का? किंवा आता तरी आहे का..? तुम्ही या संस्थेचे सभासद होता का..? आणि जर असताल तर तुम्ही सभासद झाल्यापासून या संस्थेला किती ऊस घातला याची आकडेवारी आहे का..? असा प्रश्न आता या संस्थेचा अधिकृत सभासद या टिकोजीरावांना करू लागला आहे.  त्यामुळे नुसती ‘टिकोजीराव’ ही पदवी घेऊन फक्त या संस्थेची बदनामी करायची अण हुरडफुक्या होऊन स्वतःची पाठ थोपटून घ्यायची इतकेच काय ते आपले या संस्थेविषयी योगदान म्हणायचे का.?असा प्रश्न आता सभासदही विचारत आहेत.

ज्यांच्या तळमळीवर अण लिखाणावर कोल्हेकुई सुरु होते त्यांचे कित्येक शेअर्स या कारखान्यात आहेत. त्यांच्या पूर्वजांनी स्व.मधूकाकांसोबत फिरून या कारखाण्यासाठी शेअर्स गोळा करण्यात खारीचा वाटा उचलला होता त्यामुळे त्यांच्या सध्याच्या पिढीला सुद्धा या कारखान्याचा अभिमान असणारच इतकी बुद्धी सुद्धा टिकोजीरावांना नसावी याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

तसे पाहिले तर बातम्यांचा आव आणणारे हे वेबसाईट बहाद्दर अधिकृत प्रेस माध्यमे नाहीत. (एखादे प्रकरण न्यायालयात गेले की ही माध्यमे अधिकृत की अनधिकृत याबाबत दूध का दूध अण पाणी का पाणी होते) त्यामुळे दौंड तालुक्यातील एकमेव सहकारी साखर कारखाना वाचावा आणि शेतकरी, सभासद, कामगारांचे संसार कायम आनंदी रहावेत यासाठी या कारखान्याचे अध्यक्ष, संचालक मंडळ आणि कामगार संघटना कायम आटोकाट प्रयत्न करतात आणि त्याबाबत अधिकृत माध्यमे वृत्तही प्रसिद्ध करतात यात गैर काय आहे.

ज्यावेळी कामगार आंदोलने झाली, कामगारांनी पुढे येऊन आपल्या मागण्या प्रेस समोर ठेवल्या त्या बातम्या सुद्धा या अधिकृत माध्यमांनी त्या त्या वेळी प्रसिद्ध केल्या आहेत. मात्र त्यावेळी जे संचालक मंडळाने जाहीर केले होते, ते-ते प्रश्न नंतर मार्गी लागले यात टिकोजीरावांना मिर्ची लागण्यासारखे काहीच नव्हते. त्यामुळे ही संस्था अडचणी पार करून सुरु झाली अण सभासद, कामगार सुखावला आणि आता निवृत्त कामगारही सुखावणार आहे तर टिकोजीरावांच्या बुडाला इतकी आग लागण्याचे कारण काय असा प्रश्न सभासदांना पडला आहे.