आता ग्रामिण भागातील विद्यार्थ्यांची फार्मसीचे उच्च शिक्षण घेण्याची चिंता मिटली | ‘वाखारी’ येथे सुरु झाले ‘धनाजी शेळके’ फार्मसी कॉलेज

दौंड : विद्यार्थ्यांना पुण्यात किंवा अन्य शहरांमध्ये जाऊन उच्च शिक्षण घ्यायचे म्हटले की तेथील राहण्याचा आणि जेवणाचा खर्च हा शिक्षणाच्या खर्चापेक्षा दुप्पट होत असल्याचे दिसते त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना केवळ खर्चिक बाब म्हणून फार्मसिच्या शिक्षणाला मुकावे लागत होते. मात्र आता फार्मसिच्या उच्च शिक्षणासाठी पुण्यात किंवा अन्य शहरात जाण्याची गरज नसून दौंड तालुक्यातील वाखारी येथेच सुसज्ज आणि दर्जेदार शिक्षणाची सोय धनाजी शेळके फार्मसी कॉलेजकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. वाखारी (ता.दौंड) येथे हे फार्मसी कॉलेज आता सुरु झाले आहे.

औषध निर्माण शास्त्र पदवी व पदविकाची मान्यता (B.Pharm, D.Pharm) वाखारी येथे नव्याने स्थापन झालेल्या श्री धनाजी शेळके फार्मसी महाविद्यालयास मिळाली आहे. शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये डिप्लोमा (डी. फार्म) आणि बॅचलर ऑफ फार्मसी (बी. फार्म) अभ्यासक्रमासाठी फार्मसी कौन्सिल ऑफ इंडिया, दिल्ली यांच्याकडून या कॉलेजला मान्यता देण्यात आली आहे.

पीसीआय बरोबरच डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे, महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ आणि तंत्रशिक्षण संचालनालय महाराष्ट्र शासनच्या तज्ञांच्या टीमने महाविद्यालयाच्या पायाभूत सोयी-सुविधा, लॅबोरेटरी, लायब्ररी, प्राध्यापक आणि अभ्यासक्रमाची सखोल तपासणी केल्यानंतर ही मान्यता देण्यात आली आहे.

डी. फॉर्म आणि बी. फॉर्म (D.Pharm / B.Pharm) अभ्यासक्रमांना मंजुरी मिळाल्याने दौंड तालुक्यातील आणि आसपासच्या परिसरातील विद्यार्थ्यांना वाखारी (केडगाव) येथेच हे शिक्षण मिळणार आहे. नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेशित विद्यार्थ्यांना अत्याधुनिक प्रयोगशाळा, सुसज्ज ग्रंथालय आणि अध्यापन आणि संशोधनाची आवड असलेले प्राध्यापकांसह उच्च-गुणवत्तेचे शिक्षण आणि प्रशिक्षण देणे आणि त्यांना फार्मसी क्षेत्रातील यशस्वी करीअरसाठी तयार करणे हे आमचे ध्येय आहे अशी माहिती कॉलेजच्या सचिव राधिका शेळके यांनी दिली.

या सुविधा उपलब्ध – या कॉलेजला शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या बाहेरील विद्यार्थ्यांना वसतिगृहाची आणि परिसरातील विद्यार्थ्यांना वाहतूकीची सुविधा उपलब्ध करण्यात आली असल्याचे धनशोभा फाउंडेशनचे अध्यक्ष धनाजी शेळके यांनी सांगितले.
या शैक्षणिक वर्षात या महाविद्यालयाला पदवीकरिता ६० विद्यार्थ्यांची तर पदविका करिता ६० विद्यार्थ्यांची मर्यादा उपलब्ध करून देण्यात आली आहे अशी माहिती फार्मसी शैक्षणिक समन्वयक विकास गडदे यांनी दिली. विद्यार्थ्यांना केंद्रिभूत प्रवेश प्रक्रियेदरम्यान भरावयाचा महाविद्यालयाचा चॉईस कोड १६३४३ (16343) असा आहे.