‘ते’ विधान नंदू पवार यांच्याबद्दल नव्हतेच, ‘कुल’ कुटुंबाने त्यांचा कायम आदरच केला आहे – बाळासाहेब लाटकर

दौंड : गुरुवार दि.२६ सप्टेंबर रोजी पिंपळगाव ता.दौंड येथे प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये उपस्थितांना संबोधित करताना आमदार राहुल कुल यांनी निवडणुका जवळ आल्यानंतर तालुक्यात लावण्यात आलेल्या फ्लेक्सबाबत बोलताना, टिका करणाऱ्यांनी उघडपणे समोर येऊन नावानीशी टिका करावी. उगच निवडणुका जवळ आल्या की सिजनेबल पुढारी बनून टिका करू नये, त्यांना जनतेच्या कामाचे काही देणेघेणे नाही, स्वतःचे कार्य दाखविता येत नाही म्हणून बॅनरबाजी करून बदनामी करत आहेत असे आमदार राहुल कुल यांनी म्हणत कुणाला किती टिका करायची ती करू द्या, आपण आपल्या कामातून त्यांना उत्तर देऊ असे विधान केले होते.

या विधानाचा गैर अर्थ काढून जेष्ठ नेते नंदू पवार यांनी ‘तुमचे प्रामाणिक काम करणाऱ्यांना तुम्ही सिजनेबल पुढारी म्हणता’ असे वक्तव्य केले. यावर कुल गटातील जेष्ठ नेते बाळासाहेब लाटकर यांनी बोलताना नंदू पवार यांच्याबद्दल कुल कुटुंबाला कायमच नितांत आदर राहिलेला आहे. स्व.सुभाष आण्णा कुल यांसोबत १९९० साली नंदू पवार यांनी काम केले आहे. ते या तालुक्यातील जेष्ठ नेते आहेत त्यांनी विनाकारण गैरसमज करून तो आरोप अंगावर घेऊ नये.

कुल परिवाराने तालुक्यात केलेल्या विकासकामांचे तुम्ही साक्षीदार आहात आणि तुम्ही आपल्या भाषणातूनही अनेकवेळा हे सांगितले आहे. त्यामुळे भाऊंनी गैरसमज करता जर काही वैचारिक मतभेद झाले असतील ते बसून मिटवता येतील पण अश्या प्रकारे विनाकारण गैरसमज करून घेऊ नये. आमदार राहुल कुल यांच्या विधानाचा काहींनी वेगळा अर्थ काढून त्यातून मुद्दाम संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे मात्र त्यांच्या विधानाचा आणि नंदू भाऊंचा कसलाच संबंध नसल्याचे यावेळी बाळासाहेब लाटकर यांनी आवर्जून सांगितले.