पुणे : दौंडचे माजी आमदार रमेश थोरात यांनी आज पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक ( PDCC) च्या मुख्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी नागरिकांशी आणि सभासदांशी संवाद साधताना त्यांना भेडसावणाऱ्या कर्ज वितरणाच्या अडचणी, इतर विविध मुद्दे आणि त्यांच्या अपेक्षा समजून घेतल्या.
शेतकरी, सभासद यांना कर्ज प्रक्रियेत येणाऱ्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक तथा मा.अध्यक्ष रमेश थोरात यांनी आवश्यक त्या उपाययोजना सुचवत बँकेच्या विविध सेवांबाबत मार्गदर्शन करून त्यांच्या शंका दूर केल्या. बँकेच्या प्रगतीमध्ये सभासदांचे मोलाचे योगदान आहे आणि त्यांच्या अपेक्षांची पूर्तता करत सतत सेवा सुधारण्याचा आपला दृढ निश्चय असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
पिडीसीसी बँक आणि सभासद यांच्यातील हा सकारात्मक संवाद बँकेच्या यशस्वी वाटचालीसाठी एक महत्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. गेली 35 वर्षे रमेश थोरात हे जिल्हा बँकेचे संचालक पद भूषवीत आले आहेत.तर या काळात त्यांना अध्यक्षपदाचा मान मिळाला आहे.