दौंडमध्ये महाविकास आघाडीची बैठक संपन्न | दौंड विधानसभेसाठी आयात उमेदवारांना संधी नाही |  कामाला लागा.. पक्ष श्रेष्ठिचा आदेश 

दौंड : दौंडमध्ये आज महाविकास आघाडीची बैठक संपन्न झाली. या बैठकीत पक्ष श्रेष्ठीनी महाविकास आघाडीच्या तालुक्यातील नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. तसेच दौंड विधानसभेसाठी महाविकास आघाडीतील उमेदवारांनाच संधी देण्यात येणार असून आयात उमेदवारांना संधी दिली जाणार नाही असा शब्द वरिष्ठान्नी दिल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले यांनी दिली आहे.

आज दि.२२ सप्टेंबर रोजी तालुक्यातील महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींची बैठक पार पडली. ही बैठक पक्ष श्रेष्ठी यांच्या आदेशानुसार घेण्यात आली. या बैठकीला महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी दौंड येथील “पवार पॅलेस” येथे उपस्थित होते. गेली अनेक दिवस दौंड तालुक्यातील उमेदवारीबाबत उलट सुलट चर्चांना उधान आले होते. या चर्चांना पूर्णविराम देत उमेदवारी ही आघाडीतच राहील आयात उमेदवारांना संधी नसेल त्यामुळे दौंड विधानसभा जिंकण्यासाठी एकत्रीत कामाला लागा असे जिल्हा अध्यक्ष जगन्नाथ शेवाळे यांनी वरिष्ठांचा संदेश आल्यानंतर सांगितले असल्याचे टुले यांनी सांगितले.

दौंड तालुक्यातील प्रत्येक गावात संपर्क अभियान राबवायचे व समाजातील प्रत्येक घटकांपर्यंत पोहचायचे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. संपर्क अभियानाची सुरुवात पारगाव पं.स.गणातुन दिनांक : २४/०९/२०२४ रोजी करण्यात येणार असून या अभियानाचा समारोप दौंड शहर येथे होणार आहे.

या प्रसंगी महाविकास आघाडीतील शिवसेना जिल्हाप्रमुख शरदराव सुर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख अनिल सोनवणे, दौंड शहर प्रमुख आनंद पळसे, आपचे रविंद्र जाधव, काँग्रेसचे अध्यक्ष विठ्ठलराव खराडे, शहराध्यक्ष हरिष ओझा, लोकजनशक्तीचे राहुल चव्हाण, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) चे शशांक गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार चे अल्पसंख्याक विभागाचे पुणे जिल्हा अध्यक्ष सोहेल खान, पुणे जिल्हा उपाध्यक्ष रामभाऊ टुले, महिला अध्यक्षा योगिनी दिवेकर, शहराध्यक्ष सचिन गायकवाड, युवक अध्यक्ष सचिन काळभोर, प्रदेश सरचिटणीस अजित शितोळे, सोशल मीडिया अध्यक्ष चैतन्य पाटोळे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे इच्छुक उमेदवार आप्पासाहेब पवार, नामदेव ताकवणे, डॉ.भरत खळदकर, डॉ.वंदना मोहिते, दिग्विजय जेधे हे उपस्थित होते.