दौंड : सहकारनामा
छत्रपती संभाजी महाराज या मालिकेतून येसूबाई यांची भूमिका साकारून अफाट लोकप्रियता मिळविलेल्या येसूबाई उर्फ प्राजक्ता गायकवाड यांनी आज दौंड तालुक्यातील खडकी या गावाला भेट दिली.
यावेळी सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड उर्फ येसूबाई आणि सिने अभिनेते सुभाष यादव यांनी दौंडच्या सर्वात कमी वयाच्या महिला सरपंच असलेल्या स्नेहल कळभोर यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
यावेळी सरपंच स्नेहल काळभोर यांनी प्राजक्ता गायकवाड यांचे आभार मानून त्यांनी दाखवलेला विश्वास आणि आपलेपणाच्या भावनेला कुठेही तडा जाऊन न देता जनतेच्या कामातून याची पावती देणार असल्याचे सांगितले. स्नेहल काळभोर या नुकत्याच खडकी गावच्या सरपंचपदी विराजमान झाल्या असून त्या सर्वात कमी वयाच्या महिला सरपंच म्हणून त्यांनी तालुक्यात बहुमान मिळवला आहे.
स्नेहल काळभोर यांचे वडील संजय काळभोर हे या विभागाचे जिल्हापरिषद सदस्य होते. त्यांनी केलेल्या कामाची पावती म्हणून जनतेने त्यांच्या मुलीला निवडून देऊन सर्वात कमी वयात सरपंचपद बहाल केले आहे हे विशेष