दौंड चे माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा, वक्तृत्व स्पर्धा, रक्तदान शिबिर, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

अख्तर काझी

दौंड : भीमथडी शिक्षण संस्थेचे मानद सचिव तथा माजी नगराध्यक्ष प्रेमसुख कटारिया यांचा 80 वा वाढदिवस मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. शेठजींचा वाढदिवस म्हणजे सामान्य कार्यकर्त्यांसाठी एक उत्सवच असतो याची प्रचिती सालाबाद प्रमाणे यावर्षी सुद्धा आली. भीमथडी शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेच्या प्रांगणात प्रेमसुख कटारिया यांच्या वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

शहरातील राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी कटारिया यांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार राहुल कुल, भीमथडी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. एल. एस. बिडवे ,संस्थेचे चेअरमन विक्रम कटारिया, मा. नगराध्यक्षा शितल कटारिया, गोविंद अग्रवाल, ऍड. सुधीर पाटसकर , हरिभाऊ ठोंबरे विविध पक्ष, संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच भीमथडी शिक्षण संस्थेतील मुख्याध्यापक, शिक्षक वृंद ,विद्यार्थी उपस्थित होते.

कटारिया यांना शुभेच्छा देताना आमदार राहुल कुल म्हणाले की, गेली 20-25 वर्ष मी शेठजींबरोबर काम करतो आहे, तोच उत्साह आणि लोकांविषयी आपुलकी घेऊन ते सातत्याने काम करीत आहेत. शहरातील कोणत्याही अडचणीतल्या माणसाला मदत करण्याची भूमिका ते 50-60 वर्ष देत आहेत. चढ ,उतार आले तरी शहरामध्ये आपले असणारे योगदान देऊन पुढे चालण्याचा त्यांचा प्रयत्न कित्येक वर्ष चालूच आहे. वडील बाबू शेठ बोरीकर यांनी सुरू केलेली परंपरा त्यांचे कुटुंबीय तितक्याच ताकतीने पुढे नेत आहेत. त्यांच्याकडून या शहराची सेवा होत असताना आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना सुद्धा पाठिंबा देण्याची त्यांची भूमिका असते.

फक्त शहर आणि शहराच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींसाठी ते आग्रही राहतात. शहराचे कामकाज चालू असताना सुद्धा शैक्षणिक संकुल हे चालविण्याचा, वाढविण्याचा आणि आणखीन मजबूत करण्याचा प्रयत्न सातत्याने चालू आहे. शहरातील सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपाचे प्रश्न सोडविण्यासाठी ते सातत्याने कार्यरत असतात.80 वर्ष पूर्ण झाले तरी कामाचा तोच उत्साह आहे आणि आयुष्याची 100 वर्ष पूर्ण करण्याची त्यांची क्षमता आहे. शहरासाठीचे असेच योगदान त्यांनी पुढच्या काळातही द्यावे अशा प्रकारची सदिच्छा मी आपल्या सर्वांचे वतीने व्यक्त करतो, त्यांना दीर्घायुष्य लाभावे परंतु त्यांच्या या दीर्घायुष्यामध्ये त्यांच्याकडून या परिसरातील सर्वसामान्य जनतेची व शहराची सेवा व्हावी अशी आमच्या सगळ्यांची अपेक्षा आहे असेही राहुल कुल म्हणाले.

वाढदिवसाच्या निमित्ताने संस्थेच्या कटारिया कॉलेजच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसाठी वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले तसेच सांस्कृतिक कार्यक्रम ,रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. 80 विद्यार्थ्यांनी रक्तदान करीत शिबिरास उस्फुर्त असा प्रतिसाद दिला.