Crime – महिला शिक्षिकेचे दागिने पळविणाऱ्या त्या भामट्याला अखेर लोणीकाळभोर पोलिसांकडून अटक



लोणी काळभोर : सहकारनामा (हनुमंत चिकणे) 

सोलापूर जिल्ह्यातील एका शिक्षिकेशी जुजबी तोंडओळख असलेल्या इसमाने खोटे नाव सांगून सोन्याचे दागिण्यासाह रोख रक्कम ७५ हजार रुपये पळवून नेणार्‍या इसमाला लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. 

गणेश शिवाजी कारंडे (वय- ३६, रा. श्रीपूर, ता. माळशिरस, जि. सोलापूर ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर आरोपी हा त्याचे नाव योगेश पाटील आहे असे सांगत असे. 



(19 फेब्रुवारी रोजी साजरा होत असलेल्या शिवजयंती उत्सवानिमित्त शिवभक्तांना हार्दिक शुभेच्छा)

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, २६ जानेवारी ला सोलापूर जिल्ह्यातील एका महिला शिक्षिकेला केवळ जुजबी तोंड ओळख वाढवून खोटे नाव असलेल्या योगेश पाटील याने शिक्षक महिलेचे ७५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम पळवून नेल्याची घटना पुणे – सोलापूर महामार्गावरील ऊरुळी देवाची ग्रामपंचायत हद्दीत घडली होती. त्यानुसार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात योगेश पाटील नावाच्या व्यक्तिविरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानुसार लोणी काळभोर पोलिसांनी योगेश पाटील या नामक व्यक्तीचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 

दरम्यान, हा तपास लोणी काळभोर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सूरज बंडगर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक राजू महानोर यांनी तपास सुरू केला. त्यानुसार योगेश पाटील यांनी चोरी केलेल्या मोबाइल फोनवरून आरोपी हा श्रीपूर ता. माळशिरस जि. सोलापूर येथे राहत असल्याचे  समजले. त्यानुसार आरोपीला त्याच्या  घरी जाऊन पकडण्यात पोलिसांना यश आले. 

त्याच्याकडून अधिक चौकशी केली असता योगेश पाटील याने त्याचे नाव योगेश पाटील नसून गणेश शिवाजी कारंडे आहे असे संगितले. व केलेल्या गुन्ह्यांची कबूली दिली आहे. गणेश कारंडे यांच्याविरोधात अगोदरही लोणी काळभोर पोलिसात महिलांची छेड काढण्याचा गुन्हा दाखल आहे. तपास पोलीस निरीक्षक सुरज बंडगर करीत आहेत.