यवत पोलिसांचा वाळू माफियांना पुन्हा दणका, 12 लाखाच्या 2 यांत्रिक बोटी उधवस्त



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये वाळू माफियांनी डोके वर काढल्यानंतर पोलिसांकडूनही त्यांना जशासतसे उत्तर मिळत आहे.

आज दिनांक 18/02/2021 रोजी यवत पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली यवत पोलीस स्टेशन येथील पोलीस कॉन्स्टेबल हेमंत कुंजीर, पोलीस कॉन्स्टेबल सुजित जगताप, पोलीस कॉन्स्टेबल सोमनाथ सुपेकर, पोलीस कॉन्स्टेबल नारायण जाधव व महसूल कर्मचारी पुंडलिक केंद्रे, तलाठी मिरवडी अभिमन्यू जाधव, यांच्या पथकाने दौंड व हवेली तालुक्यातील हद्दीवरील मिरवडी तालुका दौंड या गावच्या हद्दीतील मुळा मुठा नदी पत्रात अवैद्यरित्या बेकायदेशीर वाळू उपसा करून पर्यावरणास हानी करून सार्वजनिक नदीपात्राचे नुकसान करणाऱ्या 2 वाळूच्या यांत्रिक फायबर बोटी उधवस्त करून वाळू उपसा करणाऱ्या माफियांना मोठा दणका दिला आहे.



वाळू माफिया मिरवडी व इतर ठिकाणी वाळू उपसा करत असल्याची माहिती या पथकाला लागल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली आहे.

सदरची कारवाई मा.पोलिस अधीक्षक, श्री.डॉ.अभिनव देशमुख यांचे सूचनेनुसार, पोलीस निरीक्षक श्री.भाऊसाहेब पाटील, पो कॉ हेमंत कुंजीर, पो कॉ सोमनाथ सुपेकर, पो कॉ सुजित जगताप, पो कॉ /नारायण जाधव व महसूल कर्मचारी पुंडलिक केंद्रे, तलाठी मिरवडी अभिमन्यू जाधव यांच्या पथकाने केली आहे.