Indapur politics – हर्षवर्धन पाटलांच्या मनमानी कारभारामुळेच कर्मयोगी डबघाईला : प्रदीप गारटकर



इंदापूर : (तुषार हगारे) 

भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांच्या मनमानी कारभारामुळेच कर्मयोगी सहकारी साखर कारखाना आर्थिक अडचणीत आल्याचा घणाघाती आरोप पुणे जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी  पत्रकार परिषदेत केला आहे. 

इंदापूर येथे राष्ट्रवादी पक्षातील नेतेमंडळी विचारविनिमय बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधला यावेळी गारटकर म्हणाले की, शंकरराव भाऊंच्या नंतर १० वर्षातच कारखाना डबघाईला आला असून योग्य नियोजन न झाल्याने आज ९ महिने झाले तरी जानेवारी महिन्यात गेलेल्या ऊसाची बिले अद्याप दिली गेली नाहीत इतर कारखान्यांच्या तुलनेत टनामागे चारशे- पाचशे रुपये एवढा कमी भाव घ्यावा लागत आहे.        

सभासदांना आता वाटू लागले आहे निवडणूक लढवून सत्तापरिवर्तन करावे अशी इछा असून देखील हर्षवर्धन पाटील यांच्या धुर्त राजकारणामुळे कारखाना आपल्याच ताब्यात कसा राहील यासाठी विरोधी सभासदांचा ऊस गाळप करून न घेण्याची विशेष काळजी पाटलांनी घेतल्याचा आरोप देखील करत आम्हाला सक्षम उमेदवार मिळविण्यासाठी मीटिंग झाली असून पक्षांच्या नेतेमंडळींशी चर्चा करून उद्यापर्यंत योग्य निर्णय घेण्याचे जाहीर केले आहे.