Rural Festival – यवतच्या यात्रेवर कोरोनाचे संकट! ग्रामस्थ आणि यात्रा कमिटीने घेतला ‛हा’ निर्णय



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यातील यवत येथील श्री काळभैरवनाथ व महालक्ष्मी माता आईची यात्रा कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे रद्द करण्याचा निर्णय यवत ग्रामस्थ आणि यात्रा उत्सव समितीने घेतला आहे.



हा यात्रोत्सव शनिवार दि.२७/०२/२०२१ ते रविवार दि २८/०२/२०२१ रोजी संपन्न होत आहे. परंतु कोरानाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे ग्रामस्थ मंडळींनी आढावा घेऊन हि यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला असला तरी यात्रेनिमित्त होणारे देवांचे धार्मिक कार्यक्रम विधीवत केले जाणार असल्याची माहिती यवतचे सरपंच समीर दोरगे तसेच श्री काळभैरवनाथ देवस्थान व इतर देवस्थान ट्रस्ट यांच्यावतीने देण्यात आली आहे.



यवतची यात्रा हि पंच क्रोशीत आकर्षणाचा विषय असतो. या यात्रेमध्ये लोकनाट्य तमाशा तसेच कुस्तीचा आखाडा हे आकर्षणाचे केंद्रस्थानी राहून भाविक भक्तांची मोठी रेलचेल पाहायला मिळते. मात्र कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे हि यात्रा यावेळी रद्द करण्यात आली आहे.