दौंड : दौंड तालुक्यातील मळद येथील माध्यमिक विद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थिनींचा विनयभंग व लैंगिक छळ करणाऱ्या आरोपींविरोधात पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक सुभाष वाखारे व मुख्य आरोपी शिक्षक बापूराव धुमाळ यांना पोलिसांनी अटक केली आहे. आज दि.23 ऑगस्ट रोजी दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना 29 ऑगस्ट पर्यंत म्हणजेच 7 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
राज्य महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर, बारामती मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे, मा. आमदार रमेश थोरात, वैशाली नागवडे, आप्पासो पवार यांनी आज मळद ग्रामस्थांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती घेतली. सदरचा खटला जलद गती न्यायालयात चालविला जावा, या प्रकरणात विशेष सरकारी वकिलाची नेमणूक करण्यात यावी, आरोपींना कठोर शासन करण्यात यावे तसेच दोघा आरोपींना सेवेतून तत्काळ बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी मळद ग्रामस्थांकडून करण्यात आली.