बाबो… घरफोडी करणारी बंटी, बबलीची टोळी LCB कडून जेरबंद, 19 गुन्हे दाखल असल्याने पोलिसही चक्रावले



पुणे : सहकारनामा

दिनांक ०२/१२/२०१८ रोजी फिर्यादी राहूल सदाशिव तावरे (रा.सांगवी ता.बारामती जि. पुणे) यांचे फिर्यादीवरून बारामती तालुका पोलीस स्टेशन गु.र.नं.७२३/२०२० भादंविकाक ४५४,४५७,३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

सदर गुन्हयामध्ये एकूण ३ लाख ३६ हजार रुपयांची रोख रक्कम व सोने चोरीस गेले

होते. सदर गुन्हयांचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत होती. त्याप्रमाणे मा.पोलीस अधीक्षक, पुणे ग्रामीण

यांचे आदेशान्वये मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांच्याकडून सदर गुन्हयाचे तपासकामी

पथक तयार करण्यात आलेले होते.

दिनांक २२/०२/२०२१ रोजी स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण पथकास गोपनीय

बातमीदारमार्फत बातमी मिळाली की, बारामती तालुका येथील झालेल्या घरफोडी मधील आरोपी हे सध्या नागपूर

येथे असून ते भाडयाने राहत असल्याचे समजले, त्याप्रमाणे पुढील कारवाई करणेसाठी मा.पोलीस अधीक्षक,

पुणे ग्रामीण यांची परवानगी घेवून स्थानिक गुन्हे शाखाचे पथक नागपूर येथे रवाना करण्यात आले होते. 

सदर ठिकाणाबाबत मिळालेल्या माहीतीचे आधारे स्थानिक गुन्हे शाखा पुणे ग्रामिणचे पथक सापळा रचून दबा धरून बसले होते. त्यावेळी गुन्ह्यातील संशयित आरोपी हे सदर ठिकाणी आलेनंतर पथकाने त्यांना शिताफिने ताब्यात घेतले.

त्यानंतर त्यांना त्यांची नावे व पता विचारता त्यांनी त्यांची नावे १) नवनित मधुकर नाईक, (वय – ४०, २) प्रिया नवनित

नाईक, (वय – ३६ वर्षे दोघे रा.रूम नंबर २ विजय निवास, रेडीस चाळ, शिवाजीनगर, १० बी, भांडूप पश्चिम मुंबई) असे सांगितले. त्यानंतर सदर पथकाने त्यांना वरील गुन्हयासंदर्भाने स्वतंत्ररित्या विचारपूस केली असता, त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले. तसेच त्यांनी खालील जिल्हयात गुन्हे केलेले असल्याचे समोर येत आहे.

१) भोर पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.र.नं.०२/२० भादंविकाक ३७९,३४

२) लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन पुणे ग्रामीण गु.र.नं.२६२/२०१९ भादंविकाक ४५४,३८०

३) कोपरगाव पोलीस स्टेशन अहमदनगर गु.र.नं.२९६/२०१८ भादंविकाक ३८०,३४

४)पोयनाड पोलीस स्टेशन रायगड गु.र.नं.२७/२०१९ भादंविकाक ४५४,३८०

५) मोरा सागरी पोलीस स्टेशन नवी मुंबई गु.र.नं.०९/१९ भादंविकाक ३८०

६) लोणंद पोलीस स्टेशन, सातारा गु.र.नं.३९७/२० भादंविकाक ३७९,३४

७) बडनेरा पोलीस स्टेशन, अमरावती गु.र.नं.११०/२०२१ भादंविकाक ३८०

८) पेठवडगाव पोलीस स्टेशन, कोल्हापूर गु.र.नं.३१६/२०२० भादंविकाक ३८०

९) शहापूर पोलीस स्टेशन, ठाणे गु.र.नं. । भादंविकाक

तसेच वरील आरोपींनी महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात अशाचप्रकारचे खालील गुन्हे केल्याची माहीती मिळत आहे. त्यामध्ये

१) रत्नागिरी शहर पोलीस स्टेशन रत्नागिरी गु.र.नं.५५/०७ भादंविकाक ४५४,४५७,३८०

२) छावणी पोलीस स्टेशन मालेगाव जि.नाशिक गु.र.नं.१७०/१४ भादंविकाक ३८०

३) कारंजा पोलीस स्टेशन वाशिम गु.र.नं.२२१/१४ भादंविकाक ३८०

४) मिरज शहर पोलीस स्टेशन सांगली गु.र.नं. १०८/१५ भादंविकाक ३८०

५) सदर बाझार पोलीस स्टेशन जालना गु.र.नं.२३०/१५ भादंविकाक ३७९

६) वाशी पोलीस स्टेशन नवी मुंबई गु.र.नं.४५०/१६ भादंविकाक ३८०

७) वाशी पोलीस स्टेशन नवी मुंबई गु.र.नं.४५०/१६ भादंविकाक ३८०

८) रबाळे पोलीस स्टेशन नवी मुंबई गु.र.नं.४१९/१७ भादंविकाक ३८०

९) के.आर.पुरम पोलीस स्टेशन बैगलोर गु.र.नं.३८६/१७ भादंविकाक ३८०

१०) कोपरगाव पोलीस स्टेशन अहमदनगर गु.र.नं.१७८/१८ भादंविकाक ४५४,४५७,३८०

सदरची कारवाई हि पद्माकर घनवट पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण यांसह शिवाजी ननवरे पोलीस उप-निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, दत्तात्रय गिरीमकर सहा.फौजदार, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण, रविराज कोकरे, अनिल काळे, उमाकांत कुंजीर, जनार्दन शेळके, ज्योति बांबळे, अजित भुजबळ, महंम्मद अंजर मोमीन, विजय कांचन, अभिजित एकशिंग, मंगेश थिगळे, धिरज जाधव, डी.बी.डमरे, यांनी केली आहे.