मुंबई : सहकारनामा
राज्यात सध्या पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी गाजत आहे. हे प्रकरण मीडियाने लावून धरले आहे. या प्रकरणाचे बोट अप्रत्यक्षपणे वन मंत्री संजय राठोड यांच्याकडे दाखवले जात आहे.
या सर्व प्रकरणामुळे आता शिवसेनेचे नेते आणि वनमंत्री संजय राठोड यांनी आपला राजीनामा मुख्यमंत्र्यांकडे पाठवला होता. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आता काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.
याबाबत आता मोठी बातमी समोर आली असून मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांचा राजीनामा मंजूर केला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा देणे आणि तो मुख्यमंत्र्यांनी मंजूर करणे यामुळे शिवसेना गोटात मोठा धक्का बसला आहे.
समजलेल्या माहितीनुसार ‘मी राजीनामा देतो पण चौकशी पुर्ण होऊ द्यात अशी विनंती राठोड यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती.
मात्र या विषयाची संपूर्ण चौकशी झाल्यानंतर राजीनामा स्वीकारावा अशी विनंती एकनाथ शिंदे यांनी केली होती परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अखेर संजय राठोड यांचा राजीनामा स्वीकारला आहे.
पुण्यामध्ये पूजा चव्हाण या टिक टॉक स्टार ने युवतीने पुण्यात आत्महत्या केली होती. पूजाच्या आत्महत्येनंतर तिचे आणि एका व्यक्तीचे संभाषण क्लिप लिक झाली होती. पुजाचे हे संभाषण संजय राठोड यांच्यासोबतच असल्याचा आरोप भाजपने करत हे प्रकरण लावून धरले होते, आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.