कर्ज वाटप करण्यासाठी 8 हजारांची मागणी|नकार देताच सोसायटी सचिवाची अंगणवाडी सेविकेला काठीने मारहाण

देऊळगाव राजे (दौंड) : सोसायटीचे कर्ज मंजूर करण्यासाठी आठ हजार रुपये दिले नाही म्हणून अंगणवाडी सेविकेला सोसायटी सचिवाने काठीने मारहाण केल्याची घटना दौंड तालुक्यातील देऊळगाव राजे येथे घडली आहे. याबाबत सुनिता रामचंद्र नागवे (वय 49 वर्षे, व्यवसाय अंगणवाडी सेविका, रा वडगाव दरेकर ता. दौड जि पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून सोसायटीचा सचिव सुनिल मनोहर जाधव (रा.हिंगणीबेडर्डी ता दौड जि पुणे) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक तारखेच्या आत जीवे मारणार

मिळालेल्या माहितीनुसार, दि.18/07/2024 रोजी फिर्यादी अंगणवाडी सेविका ह्या नेहमी प्रमाणे वडगाव दरेकर अंगणवाडी केंद्र येथून दुपारी 01.00 च्या सुमारास घरी येउन त्यांच्या मुलाच्या कर्जा ची कागदपत्रे देण्यासाठी देऊळगाव राजे विविध कार्यकारी सहकारी सोसायटी देऊळगाव राजे (ता.दौड जि पुणे) येथे दुपारी 02.00 वाजता गेल्या. त्यावेळी सोसायटी मधील सचिव सुनिल मनोहर जाधव याने त्यांना तुम्ही तलाठ्याचा दाखला आणा मग तुमचे कर्जाचे पैसे वाटप करेल असे म्हणाला.

यावेळी फिर्यादी यांनी मी लगेच दाखला आणते मला आजच्या आज कर्जाचे पैसे द्या असे म्हणाल्या, यावर सचिव सुनिल मनोहर जाधव याने मी तुमचे कर्जाचे वाटप आज करतो मला 8 हजार रूपये द्या असे म्हणाला. त्यावेळी माझे मुलाने गाडी घेतली आहे मी पैसे देणार नाही असे फिर्यादी म्हणालेचा राग मनात धरून सचिव सुनिल मनोहर जाधव याने फिर्यादीशी हुज्जत घालून त्यांना काठीने डाव्या मांडीवर, डाव्या हातावर व उजव्या गालावर मारहाण केली. तसेच शिवीगाळ, दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी दिली.

यानंतर फिर्यादी यांनी दौड पोलीस स्टेशन येथे येऊन आरोपी सचिवाविरुद्ध तक्रार दिली. दौंड पोलिसांनी सचिव सुनिल मनोहर जाधव (रा.हिंगणीबेडर्डी ता.दौड जि.पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलिस हवालदार लोहार करीत आहेत.