रावणगाव (दौंड) : राज्य शासनाच्या कृषी विभागाने सन २०२३ खरीप हंगामासाठी आयोजित केलेल्या पीक स्पर्धेत खरीप बाजरी सर्वसाधारण गटात प्रगतशील शेतकरी लक्ष्मण (दादा) रांधवण (रावणगाव, ता.दौंड) यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
दौंड तालुक्यातील प्रगतशील शेतकरी लक्ष्मण रांधवण यांनी आपल्या शेतामध्ये खरीप हंगाम २०२३ साठी बाजरी पिकाचे हेक्टरी ५९.९६ प्रति क्विंटल उत्पादन घेतले. या यशाबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
लक्ष्मण दादा रांधवण हे रावणगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे विद्यमान संचालक असून भीमा पाटस सहकारी साखर कारखान्याचे माजी संचालक आहेत.