मुंबई | महिलेवर सामूहिक ‘बलात्कार’ करून तीची ‘हत्या’ करणाऱ्या घोळ गणपती मंदिरातील 3 ‘पुजाऱ्यांना’  लवकर शिक्षेसाठी प्रयत्न

मुंबई | ठाणे जिल्ह्यातील कल्याण तालुक्यात असलेल्या शिळगावात एका ३० वर्षीय महिलेवर सामूहिक बलात्कार करुन तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना मागील शुक्रवारी उघडकीस आली होती. शिळगावातील घोळ गणपती मंदिरातील तीन पुजाऱ्यांनी एका विवाहितेवर सामूहिक बलात्कार करुन हत्या केली होती. या घटनेतील आरोपीना शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण -नवी मुंबईतील एनआरआय पोलीस स्टेशन हद्दीतील राहणारी 30 वर्षीय विवाहित महिला कौटुंबिक कलहाला कंटाळून 6 जुलै रोजी सकाळी शिळफाटा घोळ गणपती मंदिरात आली होती.  पण मंदिरात वावरणाऱ्या राक्षसी प्रवृत्तीच्या पुजारी राजकुमार रामफेर पांडे (54), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45), श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (62) या तीन पुजाऱ्यांनी तिच्यावर रात्रभर आळीपाळीनं बलात्कार केला.

अश्या पद्धतीने अत्याचार करून तिला संपवले – ज्यावेळी ही महिला मंदिरात आली होती त्यावेळी दुपारी तिला जेवण देऊन विश्वासात घेण्यात आले नंतर सायंकाळी तीच्या चहामध्ये भांग मिसळून तिला बेशुद्ध करण्यात येउन रात्रभर तिच्यावर या तीन नराधमांनी बलात्कार केला. त्यानंतर त्यांनी मंदिराच्या मागील बाजूस नेऊन तीची हत्या केली. ही घटना 6 जुलै 2024 रोजी घडली होती. त्यानंतर 9 जुलै रोजी या पीडितेचा अर्धनग्न मृतदेह मंदिरात आलेल्या एका भक्ताला आढळून आला होता. या प्रकरणी डायघर पोलिसांनी मंदिराचे पुजारी राजकुमार रामफेर पांडे (54), संतोषकुमार रामयज्ञ मिश्रा (45), श्यामसुंदर प्यारचंद शर्मा (62) यांना चिता कॅम्प ट्रॉम्बे, मुंबई येथून अटक केली. आरोपींनी महिलेवर सामूहिक बलात्कार करून तीचा खून केल्याची कबुली दिली.

उपसभापती डॉ.निलम गोऱ्हे यांची उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणी – या घटनेतील आरोपीना शिक्षा व्हावी याकरिता विशेष सरकारी अभियोक्त्याची नियुक्ती करण्याची मागणी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.