Women’s Day : शिवसेनेच्या वतीने चौफुला (दौंड) येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन



दौंड : सहकारनामा

जागतिक महिला दिनानिमित्त सोमवार दिनांक ८ रोजी शिवसेना मध्यवर्ती कार्यालय चौफुला येथे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश पासलकर व शिवसेना महिला तालुका संघटिका स्वाती ढमाले, छाया जगताप शिवसेना पदाधिकारी व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात आला.

यावेळी सर्व कर्तृत्ववान महिलांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार व हळदी- कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमास दौंड पंचायत समितीच्या विद्यमान सभापती हेमलता फडके, माजी सभापती मीना धायगुडे, आशा शितोळे, डॉ.स्वाती लवंगारे, अंगणवाडी सेविका व मदतनिस संघटनेच्या तालुकाध्यक्ष रेखा शितोळे, किरण जांबले, पडवी ग्राम पंचायत सदस्य शुभांगी चव्हाण, बोरीपार्धी ग्रामपंचायत सदस्य उषा सोडनवर यांचे हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमेचे पुजन करण्यात आले. कमल साळुंके, शालिनी मोरे, लक्ष्मी निंबाळकर, अर्चना चव्हाण, वैशाली नेवसे, मनिषा सरगर, वर्षा होळकर, छाया माने व इतर शिवसैनिक, पदाधिकारी आवर्जून उपस्थित होते.

यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. स्वाती लवंगारे म्हणाल्या की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक शक्ती लपलेली आहे, स्वतःच्या कुटुंबासाठी महिला जे ठरवितात, त्यामुळे कोणी किती अडचणी आणल्या तरी महिला डगमगत नाहीत. यासाठी महिलांनी ह्या शक्तीचा वापर मुलींना स्वावलंबी बनविण्यासाठी केला पाहिजे. महिलांनी समाजातील  अनावश्यक  चर्चेकडे  दुर्लक्षपणे  वागणे  एकमेव  पर्याय  आहे.

त्याचप्रमाणे आपले ध्येय गाठायचे असेल तर महिलांनी स्वतःमधील आत्मविश्वास वाढविणे गरजे आहे. तसेच ज्या कुटुंबात हास्य आहे तेच आदर्श व आनंदी कुटुंब असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

यावेळी शालिनी मोरे यांनी जीवनाचा खडतर प्रवास करून मुलीला उच्च शिक्षण देऊन अमेरिकेत लष्करात उच्च अधिकारी, म्हणून कार्यरत असल्याचे मनोगतात व्यक्त केले.