Corona – पुणे जिल्ह्यातील लॉकडाउन बाबत घेण्यात आला ‛हा’ महत्व निर्णय, हे नियम पाळावे लागणार



पुणे : सहकारनामा

राज्यात आणि खासकरून पुणे जिल्ह्यात  कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव हि प्रशासनाच्या दृष्टीने डोकेदुखी बनत चालली आहे, मात्र सध्या पुणे जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे लॉकडाउन केले जाणार नसून नागरिकांनी कोरोनाबाबत शासनाने दिलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करावे लागणार आहे.

पुणे जिल्ह्यात लॉकडाउन होणार नसले तरी खबरदारी म्हणून जिल्ह्यातील शाळा 31 मार्चपर्यंत मात्र बंदच ठेवण्याचा आणि रात्रीची करण्यात आलेली संचारबंदी कायम राहील अशी माहिती पुणे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

आज शुक्रवार दि.12 मार्च रोजी सौरभ राव यांनी पत्रकार परिषदेत माहिती देताना 18 वर्षाच्या वरील लोकांना लस देण्याबाबत पाठपुरवठा करणार कोव्हिडबाबत जागृती करणार असल्याचे सांगितले.

तर टेस्टिंग, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवले जातील, शाळा, महाविद्यालय 31 मार्च पर्यंत बंद राहतील, 10-12 वीच्या विद्यार्थ्यांना यात नियम शिथिल असतील, हॉटेल रात्री 10 वाजता बंद असतील आणि दिवसा फक्त 50 % क्षमतेने ती सुरू असतील तसेच

10 नंतर तासभर पार्सल सुरू राहतील, गर्दीची ठिकाणे असलेली गार्डन संध्याकाळी बंद मात्र सकाळी व्यायामासाठी सुरू राहतील, लग्नकार्य, धार्मिक कार्यक्रम, अंत्यविधी यात 50 पेक्षा जास्त लोक सहभागी होऊ शकणार नाहीत नियम मोडल्यास गुन्हे दाखल होतील, मॉल 10 वाजता बंद होतील.

रस्त्यावर असणाऱ्या  स्टॉलवर एकावेळी 5 पेक्षा जात लोक उभे नसतील, सोसायटीमधील क्लब हाऊस बंद राहतील आणि एम पी एस सी चे  क्लासेस व लायब्ररी 50 टक्के क्षमतेने सुरू राहतील असे जाहीर केले आहे.