धक्कादायक.. पोलीस कोठडीत असणाऱ्या 3 आरोपींसह दौंडशहर आणि परिसरामध्ये 38 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा (अब्बास शेख)

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत चालले आहेत. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांमध्ये आता चिंतेचे वातावरण पाहायला मिळत आहे.

आज दि.15 मार्च रोजी दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.संग्राम डांगे यांच्याकडून मिळालेल्या माहिती नुसार आज तब्बल 38 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. धक्कादायक बाब म्हणजे पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपींपैकी तिघांनाही कोरोनाची लागण झाल्याचा अहवाल आला आहे, त्यामुळे दौंड पोलीस स्टेशन आणि दौंड लॉक अपमध्ये असणाऱ्या अन्य आरोपींच्या आरोग्याबाबत चिंतेचे वातावरण आहे.

दौंड उपजिल्हा रुग्णालयात आज एकूण 131 जणांची रॅपिड अँटीजेन चाचणी घेण्यात आली. त्यामध्ये 38 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले, यामध्ये 3 पोलीस कोठडीत असणाऱ्या आरोपींचाही समावेश होता. यामध्ये 22 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश असून दौंड शहरामध्ये 21 तर ग्रामीण भागामध्ये 17 जणांना कोरोना झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार पोलीस कोठडी, गजानन सोसायटी, मिशन हॉस्पिटल, srpf 5gr, बंगलासाईड, रेल्वेक्वार्टर, गोवागल्ली, कुंभार आळी, कुरकुंभ, श्रीगोंदा, गोपाळवाडी, मलठन, काष्टी, माळवाडी आणि खोरवडी असे एकूण 38 रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.