पुणे : बारामती लोकसभा मतदार संघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात आचारसंहिता भंग करण्यात आल्याची तक्रार कारण्यात आली आहे. एका लोकसभा उमेदवाराने ही तक्रार केली आहे.
संदीप देवकाते असे या अपक्ष उमेदवारांचे नाव असून त्यांनी सुप्रिया सुळे यांच्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रारी अर्ज करताना प्रचाराची सांगता झाली असतानाही सुप्रिया सुळे यांनी पक्षाच्या इंस्टाग्राम पेजवरून प्रचार केल्याचा आरोप केला आहे.
बारामती लोकसभेसाठी मोठी चुरस पहायला मिळत आहे. या मतदार संघात सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे या पवार घराण्यातील नणंद भावजय एकदुसऱ्याच्या विरोधात उभ्या राहिल्या आहेत तर त्यांना ओबीसी बहुजन पार्टीचे महेश भागवत यांनी आव्हान दिले आहे. उद्या बारामती लोकसभेसाठी मतदान होत असून देवकाते यांनी आचारसंहिता भंग करणाऱ्या सुळे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी निवडणूक आयोगाकडे केली आहे.