बारामती : महिलांशी बोलत बसलेल्या पतीला पत्नी, मुलगा आणि इतरांनी जबर मारहाण केल्याची घटना बारामती येथे घडली आहे. याबाबत सचिन दगडू विधाते (वय 38 वर्ष धंदा फॅब्रिकेशन रा. कुभारकरेवस्ती वंजारवाडी ता. बारामती) यांनी बारामती शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून आरोपी पत्नी निर्मला सचिन विधाते, मुलगा यश सचिन विधाते व दोन अनोळखी इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दिनांक 19/04/2024 रोजी सांयकाळी 07/00 वाजण्याच्या सुमारास उत्कर्षनगर बारामती येथील रोडवर फिर्यादी हे त्यांच्या ओळखीच्या महिलांशी बोलत उभे असताना त्यांची पत्नी सौ. निर्मला सचिन विधाते हिने तेथे येवून त्या महिलांना तुम्ही माझे नवऱ्याशी बोलत उभे का राहिला असे म्हणून त्यांना शिवीगाळ दमदाटी करीत असताना फिर्यादी पती तिला समजावून सांगू लागला.
यावेळी तिने दोन अनोळखी इसमांना फोन करून बोलावून घेत फिर्यादी यांची पत्नी निर्मला सचिन विधाते, मुलगा यश सचिन विधाते व दोन अनोळखी इसमांनी सचिन विधाते यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तर त्याच्यापैकी एकाने धारदार हत्याराने फिर्यादीच्या उजव्या बाजुच्या कमरेचे वरील भागास व डाव्या हाताच्या पंज्याच्या वरील बाजुस मारुन गंभीर दुखापत केली. अधिक तपास पोसई राऊत करीत आहेत.