दौंड : पती ने आपल्या पत्नीचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत फिर्यादी महेंद्र बऴीराम जगताप (वय-67वर्षे व्यवसाय-टेलर रा.पंचशिल थिअटर पाठीमागे जाधव चाऴ दौंड जि पुणे) यांनी फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपी विशाल दौंलत शिंदे (रा.सरपंचवस्ती,माने हाँस्पीटलसमोर,सन टेलर यांच्या दुकानाजवळ दौंड, पुणे) याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार दि 19/04/2024 रोजी सकाळी 7.00 च्या सुमारास सरपंचवस्ती, माने हाँस्पीटलसमोर, सन टेलर यांच्या दुकानाजवळ आरोपीच्या घरामध्ये आरोपी याने फिर्यादी यांची मुलगी अश्विनी विशाल शिंदे (वय-32 वर्षे ) हिला प्रांपचिक कारणावरून मारहाण करून तिचा गळा दाबून खून केला. खुनाची घटना घडल्यानंतर फिर्यादी यांचा जावई विशाल दौंलत शिंदे याच्याविरूध्द त्यांनी कायदेशीर फिर्याद दिली. आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयासमोर उभे केले असता त्याला 23 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. घटनेचा अधिक तपास दौंड शहर पोलीस निरीक्षक संतोष डोके हे करीत आहेत.