दौंड रेल्वे स्थानकावर रेल्वे दुर्घटना युद्धाभ्यास

दौंड : दौंड रेल्वे स्टेशनमध्ये सोलापूर विभाग व एन डी आर एफ (10 बटालियन) टिम यांच्यावतीने दौंड स्थानकावर युद्दाभ्यासाचे प्रात्यक्षिक (मॉक ड्रिल) चे करण्यात आले. सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहारे यांच्या मार्गदर्शनाखाली शैलेंद्र परिहार अप्पर मंडल  (रेल व्यवस्थापक) सोलापूर आणि बी के सिंह अप्पर मंडल रेल व्यवस्थापक पुणे आणि एनडीआरएफ जस्टिन यांच्या देखरेखेखाली आयोजित करण्यात आले होते.

https://youtube.com/@Sahkarnama?si=dFOt4UDcKLffV03m
सहकारनामा युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा

यामध्ये सोलापूर रेल्वे विभागातर्फे ट्रेन नं. 11421 हडपसर – सोलापूर पॅसेंजर सवारी ट्रेनची शंटिंग करते वेळेस शेवटचा कोच क्रमांक सीआर 041404/ C मालगाडीला अधिक गतीने धडक बसली त्यामुळे गाडीमध्ये प्रवास करणाऱ्या यात्रीकडे प्रतिबंधित ज्वलनशील पदार्थानी धडक बसल्यामुळे पेट घेतल्यामुळे परिस्थिती गंभीर झाली. या दुर्घटनेची माहिती सोलापूर मंडल कंट्रोल ऑफिसला त्वरित देण्यात आली व तसेच दौंड स्थानिक प्रशासन, फायर ब्रिगेड विभाग, जिल्हा रुग्णालय विभाग दौंड, पोलीस विभाग यांना मदतीसाठी माहिती देण्यात आली.

दुर्घटनेचे गांभीर्य ओळखून रेल्वे टीम, एनडीआरएफ टिम, सिव्हिल डिफेन्स व विविध सरकारी व निम्न सरकारी आपत्कालीन विभागाने जिवाची बाजी लावून कोच मधून मृत, गंभीर जखमींना कोच बाहेर काढण्यात आले व इतर घाबरलेल्या यात्रेकरुंना दिलासा देऊन पुढील प्रवासासाठी मार्गस्थ करण्यात आले. वरील सर्व विभागांनी आपला सहभाग नोंदवून रेल्वे यात्रेकरूंची सुटका केली.

वरील प्रात्यक्षिके वेळेस वरिष्ठ मंडल संरक्षा अधिकारी शिवाजी कदम, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, वरिष्ठ विभागीय यांत्रिकी अभियंता गजेंद्र सिंह मीना, सहा. विभागीय संरक्षा अधिकारी भगत, सहा. वाणिज्य प्रबंधक सुदर्शन देशपांडे, डॉ विनोद, डॉ.निरंजन, डॉ.आर श्रीनिवास आणि सहा. परिचालन व्यवस्थापक (जनरल) सोलापूर एम पी. सिंग टीम कमांडर इन्स्पेक्टर आर. जे. यादव, टीम धर्मेंद्र सेवडा , नागरी संरक्षण जगदीश सिदगणे, सहा. यांत्रिक अभियंता सिद्धार्थ सिंग दौंड पुना दिव रणजीत चाबडा आणि मिडीयाचे प्रतिनिधी वृत संकलन करण्यासाठी उपस्थित होते. डॉ सजीव एन के, चीफ मेडिकल सुपरिडेंट यांनी कृत्रिम श्वासोच्छवास व प्रथमोपचार या बद्दल माहिती व प्रात्यक्षिक सादर केले. या युद्ध आभ्यासात एकूण १०० पेक्षा अधिक स्टाफ ने सहभाग नोंदवला.

रेल्वेनी प्रवास करताना कोणत्याही प्रकारचे ज्वलनशील पदार्थ सोबत बाळगू नयेत व धुम्रपान करणे व तसेच गाडीमध्ये कचरा करणे टाळावे, कारण यामुळे गाडीला मध्ये आग लागण्याची दाट शक्यता आहे असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले.