दौंड : दौंड शहर येथील अजितदादा पवार मित्र मंडळाच्या वतीने दौंड तालुक्यातील मुस्लिम बांधवांना रमजान ईद निम्मित १० रुपये प्रति किलो दराप्रमाणे साखर वाटप करण्यात आली. येत्या दोन दिवसांत मुस्लिम बांधवांची पवित्र अशी रमजान ईद असून अवघ्या दहा रुपये दराने साखर मिळाल्याने मुस्लिम बांधवांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.
अजितदादा पवार मित्र मंडळाच्या या साखर वाटप उपक्रमाची सुरुवात दौंड तालुक्याचे माजी आमदार रमेश थोरात, माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, नंदूभाऊ पवार, राजेश पाटील, रोहित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन राजेश पाटील यांच्या अजितदादा मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आले होते.
सध्या साखरेचे दर हे सध्या चाळीशी पार आहेत. रमजान ईद निमित्त शीरखुर्मा बनविण्यासाठी साखर गरजेची असते. साखरेचे दर हे साधारण 44 रुपयांच्या आसपास असल्याने मुस्लिम बांधवांच्या खिश्याला ऐन दुष्काळात कात्री लागणार आहे. मात्र अजितदादा मित्र मंडळाकडून अवघ्या 10 रुपयांमध्ये एक किलो साखर वाटप करण्यात आल्याने येथील शेकडो नागरिकांनी साखर खरेदी केली आहे. साखर खरेदी करताना त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत होते.