दौंड ग्रामिण भागात आज ‛या’ 19 गावांतील 45 जणांना कोरोनाची बाधा, जाणून घ्या कोणत्या गावात किती रुग्ण!



दौंड : सहकारनामा

दौंड तालुक्यामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव काही केल्या कमी होताना दिसेना, दि.19 मार्च रोजी  यवत कोविड सेंटर आणि स्वामी चिंचोली कोविड सेंटरमध्ये टेस्ट झालेल्या कोरोना रुग्णांचा अहवाल प्राप्त झाला असून या अहवालानुसार 19 गावांतील सुमारे 45 जणांना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा पोळ मॅडम यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये यवत 9, केडगाव 3, गोपाळवाडी 4, राहू 3, कासुर्डी 3, देलवडी 1, वरवंड 2, पारगाव 4, पाटस 1, दापोडी 2, खामगाव 1, गिरीम 1, नानवीज 1, लिंगाळी 2, हिंगणीबेर्डी 1, गार 4, मलठन 1, दहिटने 1, सहजपुर 1 अशी गाव निहाय आकडेवारी असून कोरोनाचा वाढता प्रभाव चिंतेचा विषय बनत चालला आहे.

सध्या तालुक्यात कोरोनाचे 308 ऍक्टिव्ह रुग्ण असून हा आकडा वाढण्याची भीती वर्तवली जात आहे, त्यामुळे नागरिकांनी सोशल डिस्टनसिंग बरोबरच मास्क परिधान करणे, हाथ साबनाने वारंवार धुणे, सॅनिटायजरचा वापर करणे आणि कोरोनाची लक्षणे जाणवल्यास त्वरित जवळील आरोग्य केंद्राशी संपर्क करणे या गोष्टी पाळणे गरजेच्या आहेत.