उद्या सुनेत्रा ताई तालुक्यात येतायत, मात्र कार्यक्रम पत्रिकेत ना दादा, ना आप्पा.. तालुक्यातील नागरिकांमध्ये संभ्रम

बारामती लोकसभा निवडणूक

दौंड : बारामती लोकसभा मतदार संघामध्ये दौंड तालुक्याला मोठे महत्व आहे. त्यामुळे वरिष्ठ मंडळींकडून तालुक्यातील नेत्यांनाही मोठा मान दिला जातो. हा तालुका आपले माहेरघर आहे असे जेष्ठ नेते शरद पवार सुद्धा कायम म्हणायचे. या तालुक्यात प्रामुख्याने विद्यमान आमदार राहुल कुल आणि माजी आमदार रमेश थोरात हे गेली 20-22 वर्षे सत्तेत राहत आले आहेत. मात्र आता याच दादा आणि आप्पांचा विसर का पडला आहे हे जनतेला कळायला मार्ग नाही आणि त्यामुळे आपल्या नेत्यांना नक्की बारामतीमधून किंमत दिली जाते का असा सवालही कार्यकर्ते विचारू लागले आहेत.

याच कार्यक्रम पत्रिकेवरून नाराजी वाढत आहे

नागरिकांच्या नाराजीचे मुख्य कारण म्हणजे, महायुतीच्या बारामती लोकसभा मतदार संघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा उद्या दौंड दौरा आयोजित करण्यात आला आहे. या दौऱ्याच्या निमित्ताने त्या दौंड तालुक्यातील 15 गावांना भेट देणार आहेत. यासाठी कार्यक्रम पत्रिका सुद्धा छापण्यात आली आहे मात्र या कार्यक्रम पत्रिकेमध्ये विद्यमान आमदार राहुल कुल तसेच माजी आमदार रमेश थोरात यांचे फोटोच छापण्यात आले नाहीत. जवळपास सर्वच वरिष्ठ नेत्यांचे फोटो छापण्यात आले असताना नेमके आजी – माजी आमदारांचे फोटो का छापण्यात आले नाहीत असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे.

बारामती लोकसभा मतदार संघात ओबीसी बहुजन पार्टीने ताकत दाखवली

याबाबत लोकांमध्ये उलट सुलट चर्चा सुरु झाली असून जर आपल्या नेत्यांनाच किंमत दिली जात नसेल तर मग आपले तर काय होणार असा प्रश्न अनेकजण विचारू लागले आहेत. सर्व वरिष्ठ नेतेमंडळींचे फोटो छापलेले असताना नेमके आजी माजी आमदारांचे फोटो छापले नाहीत याचे उत्तर आता शोधायचे काम सुरु आहे.

सरकारमुळे पुण्यात कामे रखडली सुप्रिया सुळे