Daund – दौंडकरांनो.. आता घर बसल्या ‛असा’ करा आपल्या मालमत्ता कराचा भरणा – मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांची माहिती



दौंड : सहकारनामा

दौंडकर नागरिकांना घरबसल्या आपल्या मालमत्तेचा कर भरता यावा यासाठी नगरपालिकेने सर्वांसाठी सुविधा उपलब्ध करून दिली असून त्या सुविधेचा वापर करून नागरिकांनी घरबसल्या मालमत्ता कराचा धरणा करून नगर परिषदेस सहकार्य करावे असे आवाहन दौंड नगर परिषदेच्या मुख्याधिकारी निर्मला राशिनकर यांनी केले आहे.

मालमत्ता कर भरण्यासाठी घरबसल्या आपण एवढेच करावयाचे आहे— 

सर्वप्रथम आपण आपल्या जवळ चालू अथवा मागील बिल किंवा बिल भरल्याची पावती आणि आपले बँक खाते असलेल्या बँकेचे डेबिटकार्ड जवळ ठेवा. 

नंतर आपल्या अँड्रॉइड मोबाईल मधील गुगल क्रोम इंजिन वर जाऊन daundmc.org टाईप टाईप करा यानंतर आपले मालमत्ता कराची लिंक उघडली जाईल. यामध्ये आपण प्रभाग, मालमत्ता क्रमांक, प्राथमिक कर धारकाचे नाव किंवा भाडेकरू असल्यास त्याचे नाव मराठी व इंग्रजी भाषेत टाईप करा, तुम्हाला करायची थकित व चालू वर्षाची रक्कम दिसेल. यानंतर भरणा करावयाच्या 3 क्रमांकाच्या हिरव्या रंगाच्या पे Total या बटणावर क्लिक केल्यानंतर Pay property Tax दिसेल. आता आपला ई-मेल आयडी व मोबाईल नंबर टाका आणि Pay Now या बटणावर क्लिक करा. 

डेबिट कार्डद्वारे विचारलेली माहिती भरणा केलेवर आपणास भरलेल्या रकमेची पावती दिसेल. अशा प्रकारे आपण आपला मालमत्ता कर घर बसल्या भरू शकणार आहोत.