दौंड तालुक्यात ‛कोरोना’चा कहर, दोन दिवसांमध्ये शहर आणि ग्रामिण भागात 110 जणांना कोरोनाची लागण



दौंड : सहकारनामा

दौंड शहर व ग्रामिण भागात कोरोना रुग्णांची संख्या रोज वाढतच चालली आहे. दोन दिवसात शहर व ग्रामीण भागातील तब्बल 110 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे.

दि.23,24 मार्च रोजी येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये 466 जणांची रॅपिड अँटी जेन तपासणी करण्यात आली पैकी एकूण 77(शहर-26/ग्रा.51) जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.54  पुरुष,23 महिला रुग्णांना नव्याने कोरोना ची लागण झाली आहे. शहरातील स्वप्न सिद्धि अपार्टमेंट 2, जनता कॉलनी 6, बंगला साईड 4, डिफेन्स कॉलनी 1, सिंधी गल्ली 1, राजयोग अपार्टमेंट 1, गजानन सोसायटी 3, सरपंच वस्ती3, महादेव मंदिर 1, मीरा सोसायटी 1, जास्वंद अपार्टमेंट 1, राजधानी हॉटेल 1 तसेच राज्य राखीव पोलीस दल 7 या परिसरातील रुग्णांचा समावेश असल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संग्राम डांगे यांनी दिली.

तर ग्रामिण भागामध्ये दि. 22/03/2021 रोजी कोविड 19 साठी 193 स्वॅब पाठविले होते त्या पैकी 32 पॉझिटिव्ह तर 160 निगेटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह मध्ये पुरुष 22 आणि 12 स्त्रियांचा समावेश आहे अशी माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली.

पॉझिटिव्ह आलेल्या गावांमध्ये यवत -5

 राहू -5, केडगाव -8, डाळिंब -1

 खुटबाव -2, चौफुला -3

 खोपोडी -2 बोरिएंदि -1, पडवी -1

 वरवंड -2, पिंपळगाव -1, खोपोडी -2

अशी गाव निहाय आकडेवारी आहे.