7 वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करणारा नराधम यवत पोलिसांकडून जेरबंद



दौंड : सहकारनामा

दिनांक 23/3/2021 रोजी यवत पोलिस स्टेशन हद्दीतील एक 7 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर 63 वर्षे वयाच्या एका इसमाने अत्याचार केल्याबद्दल  यवत पोलीस स्टेशनमध्ये भा.द.वि.क.376,506 बाल लैंगिक अत्याचार कायदा कलम 4,8,12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर गुन्ह्यातील आरोपी हा गुन्हा केले पासून फरार होता. त्याबाबत यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधीकारी श्री.भाऊसाहेब पाटील सो.पोलिस निरीक्षक, यांनी आरोपीचा शोध घेणेसाठी एस.एस.नागरगोजे पोलिस, उपनिरीक्षक, दशरथ बनसोडे पोलीस नाईक, संजय नगरे यांचे एक खास पथक तयार करून आरोपीस अटक करणे बाबतच्या सूचना दिल्या होत्या. 

सदर आरोपी हा उसाचे शेताचे पिकात लपून बसल्याची माहिती सदर पथकास मिळताच डॉ. अभिनव देशमुख सो. पोलीस अधीक्षक पुणे ग्रामीण, मिलींद मोहिते सो. मा.अप्पर पोलिस अधीक्षक बारामती, राहुल धस  सो.उपविभागीय पोलीस अधिकारी दौड विभाग तसेच यवत पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील सो. यांचे मार्गदर्शनाखाली ता.24/3/2021 रोजी श्री.एस.एस. नागरगोजे  पोलिस उपनिरीक्षक, दशरथ बनसोडे पोलीस नाईक, संजय नगरे, रमेश चव्हाण यांनी फरार आरोपीस तात्काळ उसाचे शेताचे पिकातून ताब्यात घेऊन गुन्ह्याचे पुढील तपासकामी यवत पोलिस स्टेशन येथे आज हजर केले.

सदर गुन्ह्याचा पुढील तपास भाऊसाहेब पाटील सो. पोलीस निरीक्षक यांचे मार्गदर्शनाखाली एस.एस. नागरगोजे  पोलिस उपनिरीक्षक हे करीत आहेत.