काँग्रेसच्या उमेदवारांची यादी निश्चित, पुण्यातून रवींद्र धंगेकर तर ‘या’ 13 ठिकाणी असणार हे उमेदवार

लोकसभा 2024 | अखेर काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांच्या नावाची लिस्ट समोर आली आहे. दिल्लीत झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागांबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले असून महाराष्ट्रात काँग्रेस किमान अठरा  जागा लढवणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. दिल्ली येथे आज झालेल्या या बैठकीत अठरा  उमेदवारांच्या नावांची चर्चा होऊन यातील जवळपास तेरा ठिकाणची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

लोकसभा निवडणुकीसाठी पुण्यातून रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीच्या वतीने लढणार असल्याचे निश्चित झाले आहे. काँग्रेसच्या यादीत पुण्याच्या जागेसाठी रवींद्र धंगेकर यांचं नाव निश्चित करण्यात आल्याचं सूत्रांकडून समजत आहे. त्यामुळे पुण्यातून रवींद्र धंगेकर, सोलापुरातून प्रणिती शिंदे, अमरावतीतून बळवंत वानखेडे, नंदुरबारमधून के. सी. पाडवी यांचे चिरंजीव, गडचिरोलीतून नामदेव उसेंडी कोल्हापुरातून शाहू छत्रपती महाराजांना उमेदवारी देण्याचे निश्चित केल्याची माहिती मिळत आहे. येत्या एक दोन दिवसात काँग्रेसच्या लोकसभा उमेदवारांची यादी अधिकृतरित्या जाहीर करण्यात येणार असल्याचे समजते.

काँग्रेसकडून खालील लोकसभा मतदार संघांमध्ये या उमेदवारांची नावे निश्चित झाल्याचे समजते.

चंद्रपूर – विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार

अमरावती – आ. बळवंत वानखेडे

नागपूर – आ. विकास ठाकरे

सोलापूर – आ. प्रणिती शिंदे

कोल्हापूर – शाहू छत्रपती

पुणे – आ.रवींद्र धंगेकर

नंदुरबार – गोवाशा पाडवी (के. सी पाडवी यांचा मुलगा)

नागपूर – आ. विकास ठाकरे

गोंदिया – भंडारा – आ. नाना पटोले

गडचिरोली – नामदेव किरसान

अकोला – अभय पाटील

नांदेड – वसंतराव चव्हाण

लातूर – डॉ. कलगे