सहकारनामा इफेक्ट | दौंड-पुणे डेमू आली फलाट  2 वर.. प्रवाशांना मोठा दिलासा, ‘सहकारनामा’च्या बातमीची रेल्वे प्रशासनाकडून दखल

दौंड : सहकारनामा ने दौंड रेल्वे प्रवाशांचे हाल, दौंड -पुणे डेमु थांबविली जाते त्रासदायक प्लॅटफॉर्मवर… अशा मथळ्याखाली बातमी प्रकाशित केली होती. दौंड रेल्वे प्रशासनाने सहकारनामा च्या या बातमीची दखल घेत दौंडहुन पुण्याला जाणारी सायंकाळची डेमु स्थानकातील फलाट क्रमांक 2 वरून सोडली जात असल्याची माहिती प्रवाशांनी दिली आहे.

दौंडहुन पुण्याला जाणारी सायंकाळी 5  ची डेमु (शटल) दौंड रेल्वे स्थानकातील लांबच्या व प्रवाशांच्या गैरसोयीच्या अशा फलाट क्र.4 वरून सोडली जायची. ज्यामुळे या गाडीने प्रवास करणाऱ्या दौंडच्या महिला, लहान मुले, वृद्ध, आजारी प्रवाशांना मोठी पायपीट करावी लागायची. प्रवाशांचे खूपच हाल होत होते. सदरची डेमु स्थानकातील लांबच्या फलाट क्र. 4 वरून न सोडता 2,3,5 किंवा 6 क्रमांकाच्या फलाटावरून सोडली जावी अशी दौंडकर प्रवाशांची रेल्वे प्रशासनाकडे मागणी होती. परंतु रेल्वे प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केले होते.

ही बाब प्रवाश्यांनी सहकारनामा ला कळविल्यानंतर दौंड रेल्वे प्रवाशांचे हाल, दौंड -पुणे डेमु थांबविली जाते त्रासदायक प्लॅटफॉर्मवर… अशा मथळ्याखाली सहकारनामा ने बातमी प्रकाशित केली होती. दौंड रेल्वे प्रशासनाने सहकारनामा च्या या बातमीची दखल घेतली आहे. सध्या दौंडहुन पुण्याला जाणारी सायंकाळची डेमु स्थानकातील फलाट क्रमांक 2 वरून सोडली जाऊ लागली आहे.. रेल्वे प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचे प्रवाशांनी स्वागत केले आहे व सहकारनामा चे आभार मानले आहेत.