15 गावांतील 32 जण पॉझिटिव्ह, यवत, वरवंड, केडगावमध्ये सर्वाधिक रुग्ण!



दौंड : सहकारनामा

कोरोना विषाणूच्या प्रदूर्भावामुळे सध्या राज्यात, जिल्ह्यात आणि दौंड तालुक्यातही मोठ्या प्रमाणावर कोरोना बाधित रुग्ण सापडत आहेत त्यामुळे आता विविध उपाययोजना अंमलात आणल्या जात आहेत. मात्र तरीही कोरोना रुग्ण वाढतच चालले आहेत.

दिनांक 25 मार्च 2021 रोजी कोविड 19 साठी यवत ग्रामिण रुग्णालयाकडून 116 स्वॅब पाठविण्यात आले होते. या 116 पैकी 32 जण पॉझिटिव्ह आले असून 74 जण निगेटिव्ह आले असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी दिली आहे.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये  25 पुरुष आणि 17 महिला आहेत. पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये यवत -13, उरुळी – 4, वरवंड – 5, राहू -1, कडेठान -1, पडवी -3, कानगाव -1, नानगाव -1, पाटस -1, केडगाव -5, भरतगाव -1, खुटबाव -1, पिंपळगाव -2, कासुर्डी -1, गोखलेनगर -1 असे 32 जण पॉझिटिव्ह आले आहेत.

पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 5 वर्षांच्या चिमुकल्यांसाह 70 वर्षे वयाच्या वृद्धाचा समावेश आहे.