Big News : पुण्यातील फॅशन स्ट्रीटला भीषण ‛आग’, 2 हजार दुकाने जाळून खाक झाल्याची भीती!



पुणे : सहकारनामा

पुणे शहरामध्ये कॅम्प परिसरात असणाऱ्या  फॅशन स्ट्रीट या कपड्यांच्या सर्वात मोठ्या बाजाराला दि.26 मार्च रोजी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत व्यापाऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून येथील जवळपास सर्व दुकाने जळून खाक झाली आहेत. 

हि आग विझविण्यासाठी पुण्यातील अग्निशमन दलाचे 15 बंब घटनास्थळी पोहचले मात्र अरुंद जागा आणि गर्दी यामुळे आग विझवण्यात मोठ्या अडचणी आल्या.  2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर ही आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.

पुणे शहरामध्ये फॅशन स्ट्रीट हे कपड्यांसाठी प्रसिद्ध अशी बाजारपेठ आहे. अतिशय कमी जागेत वसलेले हे मार्केट मात्र पुणेकरांच्या कपडे खरेदीचे केंद्र बिंदू  मानले जाते. या ठिकाणी जवळपास 2 हजार छोटी मोठी कपड्यांची दुकाने आहेत. त्यामुळे लागलेल्या आगीमध्ये व्यापाऱ्यांचेही खूप मोठे नुकसान झाले आहे.

व्यापाऱ्यांनी येथे लागलेल्या आगीची चौकशी करण्याची मागणी केली आहे. कारण येथे जवळपास हॉटेल किंवा चहाची टपरीसुद्धा नाही त्यामुळे व्यापाऱ्यांचा संशय बळावला आहे.