दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील ग्रामिण भागामध्ये सध्या कोरोनाचा प्रसार झपाट्याने होताना दिसत आहे.
आज दि.27 मार्च रोजी एकाच दिवसात 50 जणांना कोरोनाची बाधा झाली असल्याचे यवत ग्रामिण रुग्णालयाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. याबाबत यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.इरवाडकर यांनी माहिती दिली आहे.
डॉ.इरवाडकर यांनी दिलेल्या माहितीनुसार आज दि. 27/03/2021 रोजी कोविड 19 साठी 157 स्वॅब पाठविण्यात आले होते. या 157 पैकी 50 जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत तर 107 जण निगेटिव्ह आले आहेत.
यामध्ये 29 पुरुष आणि 21 महिलांचा समावेश असून यामध्ये 11 वर्षाच्या मुलापासून ते 95 वर्षाच्या वयस्क व्यक्तींचा समावेश आहे. हे सर्वजण दौंड तालुक्यातील ग्रामिण भागातील रहिवासी आहेत.
पॉझिटिव्ह आलेले रुग्ण हे यवत -10, पाटस – 5, खुटबाव – 3, राहू – 2, केडगाव -7, वरवंड -5, चौफुला -3, पारगाव – 2, तांबेवाडी – 1, भांडगाव – 3, कानगाव – 1, पिंपळगाव – 3, जावजीबुवाचीवाडी – 3, खामगाव – 1, बोरीपार्धी -1 असे 15 गावांतील 50 रुग्ण आहेत.