दौंड : सहकारनामा
गेल्या वर्षी राज्यात कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर अनेक कोविड योद्ध्यांचे शासनाला सहकार्य लाभले आणि या कोविड योद्ध्यांचा सन्मानही करण्यात आला.
मात्र या कोविड योद्ध्यांना खरा सन्मान द्यायचा असेल तर त्यांना कोविड प्रतिबंधात्मक लस मोफत देण्याची गरज असून याबाबत दौंडचे आमदार राहुल कुल यांनी शासनाला पत्राद्वारे विनंती केली आहे.
आमदार राहुल कुल यांनी पत्राद्वारे कोरोना विरुद्धच्या लढाईमध्ये आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स यांच्याबरोबर राज्यातील केमिस्ट बंधू भगिनी देखील जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य चोखपणे बजावत असून त्यांचा विविध रुग्णांशी थेट संपर्क येत असतो तेव्हा राज्यातील केमिस्ट बांधवांसाठी कोव्हीड १९ प्रतिबंधात्मक लस मोफत देण्यात यावी अशी मागणी केली आहे.
त्यांनी या मागणीचे पत्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (विरोधी पक्षनेते, विधानसभा), अजित पवार, (उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा) राजेशजी टोपे, (आरोग्यमंत्री, महाराष्ट्र राज्य) राजेश देशमुख, (जिल्हाधिकारी, पुणे) यांचेकडे पाठवले असून यात केमिस्ट बंधू भगिनी कोविड योद्ध्यांना ही लस मोफत देण्याची मागणी केली आहे.
आमदार राहुल कुल यांची केमिस्ट असो.च्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची निवासस्थानी भेट घेऊन याबाबत नुकतेच एक निवेदन दिले होते.