चारचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड, चोरलेल्या 2 पिकअप, ट्रक, पाण्याची टाकी जप्त

पुरंदर : स्थानिक गुन्हे शाखेने चारचाकी वाहने चोरणारी टोळी गजाआड करून त्यांच्याकडून चोरलेल्या 2 पिकअप, आणि ट्रकमधील एक पाण्याची टाकी असा मुद्देमाल जप्त केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार सासवड शहरातील धुमाळ पेट्रोल पंपासमोर फिर्यादी अनिल बाबुराव फडतरे (वय ४७ वर्षे रा. सुपे खा ता. पुरंदर, जि. पुणे) यांनी त्यांचे मालकीचा ट्रक नं. MH-06-K-5429 असा दि. ०९/०२/२०२४ रोजी रात्रीचेवेळी ट्रकमधील पाण्याच्या टाकीसह चोरीस गेला असल्याची फिर्याद दिली होती. त्याप्रमाणे सासवड पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथकामार्फत चालू असताना सीसीटीव्ही तपासण्यातआले. गुन्ह्याची कार्यपद्धतीचा अभ्यास केला असता, सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांनी केला असल्याचे निष्पन्न झाले. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चारचाकी वाहने चोरणारे रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेण्यास सुरूवात केली. तपासा दरम्यान पथकाला सदरचा गुन्हा हा रेकॉर्डवरील गुन्हेगार १) ओमकार हरी शेळके, (वय १९ वर्षे, रा. होलेवस्ती, उंड्री ता.हवेली जि. पुणे) याने त्याच्या साथीदारांच्या मदतीने केला असल्याचे समजले. माहितीच्या आधारे दि. २४/०२/२०२४ रोजी त्यास उंड्रीपरीसरातून व त्याचा साथीदारा २) मेहबूब ऊर्फ राजु अब्दुल शेख (वय १९ वर्षे रा. आदर्श कॉलनी,हांडेवाडी ता. हवेली जि. पुणे) यास ताब्यात घेवून चौकशी केली असता त्यांनी गुन्हा केल्याचे सांगितले.

गुन्हयातील चोरी केलेल्या ट्रक व पाण्याची टाकी खरेदी करणारा आरोपी ३) फाजील अहमदखान पठाण (वय २९ वर्षे रा. बाबानगर, ता. उदगीर, जि. लातूर) यास ताब्यात घेवून त्याचेकडून पाण्याची टाकी हस्तगत करण्यात आलेली आहे. गुन्ह्यातील ट्रक आरोपी अहमद चांदपाशा शेख (पाहिजे आरोपी) यास विक्री केला असल्याने आरोपी फाजील पठाण याच्याकडून ट्रक विक्री करून मिळालेली रोख रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे. अटक आरोपी क्र. १ ते ३ यांचेकडून आणखी दोन पिक अप वाहने हस्तगत करणेत आलेली असून सदर पिकअप वाहनांबाबत तपास करता

१) जळकोट पो स्टे जि. लातूर गु.र.नं २६/२०२४ भादंवि ३७९, २)लोणीकाळभोर पो स्टे गुरनं ११५/२०२४ भादंवि ३७९ प्रमाणे गुन्हे उघडकीस आले असून आरोपी क्र. १ ते ३ यांचेकडून पाण्याची टाकी, रोख रक्कम, दोन पिकअप वाहने असा एकूण नऊ लाख रूपयांचा मुद्देमाल हस्तगतकरणेत आलेला आहे.

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, (पुणे ग्रामीण) अपर पोलीस अधीक्षक संजय जाधव (बारामती विभाग) उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीकांत पांडुळे, (भोर विभाग, सासवड) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सपोनि कुलदीप संकपाळ, सपोनि योगेश लंगुटे, पोसई प्रदीप चौधरी, पोलीस अंमलदार विजय कांचन, राजु मोमीण, अतुल डेरे, स्वप्निलअहीवळे, अमोल शेडगे, तुषार भोईटे, धिरज जाधव, सासवड पो स्टे कडील पोलीस अंमलदार सपोनि बाजीराव ढेकळे, पोसई अतुल खांदरे, पोलीस अंमलदार गणेश पोटे, जब्बार सय्यद, यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास सासवड पोलीस स्टेशन हे करत आहे. गुन्ह्यातील अटक आरोपींना न्यायालयाने दि. ०२/०३/२०२४ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केली आहे.