Crime – केडगावमध्ये ‛दरोडा’ टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला यवत पोलिसांनी पकडले, मुद्देमाल जप्त



दौंड : सहकारनामा

केडगाव परिसरात दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला यवत आणि केडगाव पोलिसांनी शिताफीने पकडून जेरबंद केले आहे, यावेळी त्यांच्याकडून मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार  दि.२८ मार्च तेे २९ मार्च रोजी पोसई गंपले, पो.ना.आर.आर.गोसावी पो.ना. बी.व्ही चोरमले पो.ना.डी.एस.बनसोडे, पो.कॉ.व्ही.एल.जाधव, पो.कॉ.टी.ए.करे, होमगार्ड खंडाळे, होमगार्ड गायकवाड हे यवत पोलीस स्टेशन असणाऱ्या केडगावमध्ये नाईट राउंड पेट्रोलिंग डयुटी करत असताना  दि.२९/०३/२०२१ रोजी

रात्रौ ०३/३० वा चे सुमासरास केडगाव गावचे हददीत बाजारपेठ परीसरात पेट्रोलींग करत आसताना त्यांना तेथे एक पांढरे रंगाची होन्डा सी.टी. नंबर नसलेली कार संशयित रीत्या उभी दिसली.

पोलीस या गाडीचे जवळ गेले असता गाडीत बसलेले ५ इसम आमची चाहुल लागताच पळुन जावु लागल्याने पोलिसांनी  सदर इसमांचा पाठलाग करून ५ पैकी ४ इसमांना पकडले व १ इसम हा

अंधाराचा फायदा घेवुन पसार झाला. 

त्या ४ इसमांना त्यांचे नाव पत्ता विचारता त्यांनी १) आरीफ फकीर महंमद

ख (वय –२८ वर्षे, रा.नॅशल सोसायटी अहमदनगर, २) कमलेश बाळासाहेब दाणे (वय २१ वर्षे रा.नारायण ढेह रा. अहमदनगर) ३) सलमान सादीक शेख (रा.मोमीन पुरा बिड) ४) सलिम दगडु पठाण (वय २८ वर्षे,रा. मुकुद नगर अहमनगर) व पळुन गेलेले इसमाचे नाव ५) सोहेल मोमीन (रा.बिड) असे सांगितले.

या आरोपींची आंगझाडती घेतली असता त्यांच्याकडे  ४ माबाईल, १ कटावणी, स्क्रू ड्रायव्हर, मिरची पुड, ८ फुट लांबीची सुती

दोरी, एक चाकु, मिळुन आला आहे तसेच त्याचेकडील पांढरे रंगाची होन्डा सीटी कारची झडती घेता त्यामध्ये दोन लोखंडी कटावणी, एक लोखंडी कटर काळे रंगाचे दोन बुरखे, दोन नंबर प्लेट एम.एच.०४ बी.

डब्यु.७९३२ असा मुददेमालसह दरोडयाचे तयारीत असताना केडगाव ता.दौंड जि.पुणे येथे मिळून आले आहेत. 

या सर्व आरोपींविरूध्द यवत पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कार्यवाही ही मा.पोलीस अधीक्षक सो, डॉ.अभिनव देशमुख सो, मा.अप्पर पोलीस अधीक्षक सो, मिलींद मोहीते साो, मा.उपविभागीय पोलीस अधीकारी सो, राहुल धस सो, यांच्या मार्गर्शनाखाली

पोलीस निरीक्षक भाउसाहेब पाटील सो, पोसई गंपले साो, पो.ना.आर.आर.गोसावी, पो.ना.डी.एस. बनसोडे , पो.ना. बी.व्ही चोरमले, पो.ना.काळे, पो.कॉ.व्ही.एल.जाधव, पो.कॉ.टी.ए.करे , पो.कॉ.भोसले, पो.कॉ.गडधे, होमगार्ड खंडाळे, होमगार्ड गायकवाड  यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक पदमराज गंपले हे करीत आहेत.