जे 70 वर्षांत झालं नाही ते आनंद थोरातांनी काही महिन्यात करून दाखवलं, अखेर ‘ती’ घरे प्रकाशमान झाली

अब्बास शेख

पुणे : इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो असे म्हटले जाते आणि याची प्रचिती वेळोवेळी येतही राहते. लोक एखाद्या सोईपासून वंचित राहत असतील तर ती सोय त्यांना मिळण्यासाठी जो धडपड करतो तो खरा सामाजिक बांधिलकी जपणारा व्यक्ती आणि नेता म्हणून गणला जातो.

गेल्या 75 वर्षांपासून लाईटला वंचित असलेल्या सातारा जिल्ह्यातील एका वस्तीला आणि तेथील कुटुंबांना दौंड तालुक्यातील आनंद काकासाहेब थोरात, जितेंद्र मोहन यांनी सामाजिक बांधिलकी जपत केंद्र सरकारच्या योजनेतून लाईट ओढून देण्यात मोठे योगदान दिले आणि पुणे जिल्ह्यात राहून सातारा जिल्ह्यातील पिडीत कुटुंबांना न्याय मिळवून देण्यात सिंहाचा वाटा उचलला आहे.
आपल्या समाज बांधवांना आणि इतरांना सर्व प्रकारच्या सुविधा सोयी मिळाव्यात म्हणून आनंद थोरात हे कायम धडपडत असतात यावेळी त्यांना साथ मिळाली ती जितेंद्र मोहन यांची.

सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यात गाडगेवाडी ग्रामपंचायत आहे. येथेच डोंगराच्या पायथ्याला म्हणजे गावापासून चार किलोमीटर अंतरावर धनगर समाजातील ढेबे परिवार आणि कचरे परिवार यांची लोकवस्ती आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली पण ही वस्ती आजही अंधारात होती. लाईट त्यांच्याकडे जाणं शक्यच नाही असं म्हटलं जात होतं. त्यामुळे आपण सर्व उजेडामध्ये आहेत प्रकाशामध्ये आहेत पण सातारा जिल्ह्यातील डेभे परिवार आणि कचरे परिवाराची वस्ती अंधारात आहे हे दुःख आनंदजी थोरात यांच्या मनात घर करून राहिलं होतं.

भारत सरकारच्या घर तेथे विज हा जो उपक्रम आणि योजना आहे या योजनेचा पाठपुरावा करून आनंद थोरात यांनी गाडगे वाडी ग्रामपंचायत येथील ढेबे परिवाराने कचरे परिवार यांच्या लोकवास्तीमध्ये महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डाकडून लाईट जाण्यासाठी अथक प्रयत्न करण्यात आले. यासाठी महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी बोर्डचे अधिकारी रणजित शहाजीराव चांदगुडे यांनी दर्शनी भागात जाऊन लाईट लागली का याची तपासणी केली आणि दोन्ही परिवाराचे अभिनंदन केले.

या सगळ्या विषयाचा पाठपुरावा गेल्या अनेक दिवस करत असलेले सामाजिक कार्यकर्ते आनंदजी थोरात आणि जितेंद्र उर्फ पापाजी मोहन या दोघांच्या विशेष प्रयत्नातून केंद्र सरकारच्या या योजनेचा सरकारच्या अधिकाऱ्यांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा करून खंडाळा जिल्ह्यातील अतिशय दुर्गम भागात महाराष्ट्र इलेक्ट्रिसिटी ची लाईट नेण्यात यश मिळाले. आज या परिवारातील सर्व मंडळी आनंदाने नाचत आहेत. आनंद थोरात यांनी केंद्र सरकारची योजना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले आहेत. याबाबत सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ कुलकर्णी (ज्ञानदा गुरुकुल पुणे) यांनी विशेष आभार मानले आहेत.