पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला निवडणूक आयोगाकडून तुतारी हे नवे चिन्ह देण्यात आले आहे. पक्षाला मागितल्या पैकी एक चिन्ह लवकर देण्यासाठी सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला आदेश दिले होते. शरद पवार यांच्या गटाकडून चिन्हासाठी तीन पर्याय देण्यात आले होते.
पक्षाला नाव मिळाल्यानंतर चिन्ह लवकर मिळाले अशी पक्षाची मागणी होती. आता शरद पवार गटाला तुतारी हे चिन्ह मिळालं असून खुद्द शरद पवार गटाकडून याबाबत माहिती देण्यात आली आहे.
आता आगामी निवडणूकीत शरद पवार यांच्या पक्षाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार असे नाव असणार आहे आणि त्यांचं चिन्ह तुतारी असणार आहे.