दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील भीमा पाटस सहकारी साखर कारखाना लवकरच नव्या जोमाने सुरू होणार असून यामुळे या कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांना अच्छेदिन येणार आहेत.
कारखाना लवकरच सुरू होईल याबाबत कारखान्याचे अध्यक्ष आणि तालुक्याचे आमदार राहुल कुल यांनी भीमा सहकारी साखर कारखान्याची ३८ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत विश्वास व्यक्त केला आहे.
काल दि.30 मार्च रोजी भीमा पाटस कारखान्याची सर्वसाधारण सभा त्यांच्या अध्यक्षतेखाली ऑनलाईन पध्दतीने खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली त्यावेळी ते बोलत होते.
भीमा पाटस कारखाना चालु करण्यासाठी सर्व स्तरावर सामुहीक प्रयत्न चालु असुन त्यासाठी केंद्रीय गृहमंत्री नामदार अमितभाई शहा, खासदार आदरणीय शरदचंद्रजी पवार, राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस, राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार, महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री नामदार दिलीपरावजी वळसे पाटील, राज्य सरकार व सर्व बँका या सर्वांचे विशेष सहकार्य मिळत असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून नमूद केले.
नजीकच्या काळात सर्व अड़चणींवर मात करत निश्चित कायमस्वरुपी तोडगा काढुन कारखाना येत्या हंगामात नव्या जोमाने सुरु करु असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त करत यंदाच्या आर्थिक वर्षात कारखाना बंद असताना सुध्दा कामगारांची १५ कोटी ८५ लाखाची देणी आपण अदा केलेली आहेत हे नमुद केले.
बहुसंख्य सभासदांनी ऑनलाईन चर्चेमध्ये सहभाग घेतला. उपस्थित सभासद बंधु-भगिणींचे स्वागत कारखान्याचे व्हा.चेअरमन नामदेव बारवकर यांनी, सभेचा श्रध्दांजली ठराव कारखान्याचे संचालक विकास शेलार यांनी व कारखान्याचे संचालक तुकाराम ताकवणे यांनी सर्वांचे आभार मानले.
वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी कारखान्याचे संचालक पंढरीनाथ पासलकर, अरुण भागवत, आप्पासाहेब हंडाळ, आबासाहेब खळदकर, नामदेव शितोळे, तुकाराम अवचर, चंद्रकांत नातु, माणिक कांबळे, महेश शितोळे, मारुती फरगडे, बाळासाहेब तोंडे पाटील आदि उपस्थित होते.