पुणे : सहकारनामा
महाराष्ट्र राज्यातील कोरोना रूग्णांना लवकरात लवकर प्लाझ्मा उपलब्ध होण्याकरता महाराष्ट्र शासनाच्या वतीने प्लाझ्मा सेंटर तयार करूण ज्यांना प्लाझ्मा दान करायचा आहे व ज्या रूग्णांना प्लाझ्मा पाहीजे आहे अशांना लवकरात लवकर प्लाझ्मा मिळावा यासाठी शासनाच्या वतीने लकरात लवकर प्लाझ्मा सेंटर सुरू करूण टोलफ्री नंबर नागरिकांना देण्यात यावेत अशी मागणी नागरिक, शेतकरी संघाच्या वतीने करण्यात आली आहे.
याबाबत राज्याच्या मुख्यमंत्र्यांना डिजिटल माध्यमाद्वारे पत्र पाठविण्यात आले असून नागरिक शेतकरी संघाच्या वतीने पुणे शहर महिला उपाध्यक्षा सौ. कोमल सांवत यांनी या पत्राद्वारे मुख्यमंत्र्यांना विनंती केली आहे.
त्यांनी लिहिलेल्या पत्रामध्ये महाराष्ट्र राज्यातील कोविड रुग्णांना प्लाझ्माची खूप गरज आहे, शासनाने प्लाझ्मा मिळण्याकरता ज्या उपाय योजना केल्या आहेत त्याची माहिती रुग्णांच्या नातेवाईकांना मिळत नसल्याने खुप त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या वतीने लवकरात लवकर प्लाझ्मा सेंटर सुरू करूण लवकरात लवकर सुरू करावे आणि प्लाझ्मा टोलफ्री नंबर महाराष्ट्र राज्यातील सर्व नागरिक बांधवांना कळवण्यात यावा अशी विनंती केली आहे.
टोल फ्री क्रमांक दिल्याने ज्यांना प्लाझ्मा दान करायचा आहे ते प्लाझ्मा दान करूण देश सेवा बजावतील व ज्या रुग्णांना प्लाझ्मा पाहीजे आहे त्यांना लवकरात लवकर मिळण्यास मदत होईल असे या पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे.