दौंड : सहकारनामा
दौंड तालुक्यातील यवत कोविड सेंटर (यवत ग्रामिण रुग्णालय) तर्फे घेण्यात आलेल्या 108 जणांच्या स्वॅबमध्ये आज पुन्हा 49 जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालातून स्पष्ट झाले आहे.
हे स्वॅब 31 मार्च रोजी घेण्यात येऊन ते पुण्यातील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले होते. आज त्यांचा अहवाल समोर आला असल्याची माहिती यवत ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
पॉझिटिव्ह आलेल्यांमध्ये 33 पुरुष आणि 16 महिलांचा समावेश असून त्यांचे वयोमान हे 12 ते 80 वर्षांदरम्यान आहे.
पॉझिटिव्ह आलेले रुग हे कासुर्डी -5, भांडगाव -5, यवत -12, खामगाव -2, देलावडी -1, राहू -7, केडगाव – 1, खोर – 1, माळशिरस – 1, कोरेगाव भिव्हर -2, पारगाव -1, नाथाचीवाडी – 1, सहजपूर – 1
वाखारी – 1, उरुळीकांचन – 1, लडकतवाडी – 1, पाटस – 2, बोरीपार्धी -2
गलंडवाडी – 1, भरतगाव – 1 या गावांतील असून त्यांची आकडेवारी हि चिंता करायला लावणारी आहे.