काय सांगता.. एटीएम ATM मधून पैसे काढण्यासाठी आता ATM कार्डची गरज भासणार नाही!



पुणे : सहकारनामा

सध्या नवनवीन तंत्रज्ञानामुळे दररोजच्या दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अनेक गोष्टी सोप्या होऊ लागल्या आहेत. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आता सर्वच क्षेत्रात मोठी क्रांती घडत असून यात बँकिंग क्षेत्रातही मागे राहिले नाहीये.

अगोदर लोकांना आपलेच पैसे काढण्यासाठी तासंतास रांगेत उभे रहावे लागायचे, त्यानंतर  एटीएम मशीन (ATM) आल्या आणि बँकेत लांब रांगेत उभे राहून पैसे काढण्याची कटकट कायमची मिटली. या क्षेत्रात अजूनही नवनवीन तंत्रज्ञान विकसित होत असून आता एटीएम ATM कार्ड ही जवळ ठेवण्याची आवश्यकता भासणार नाहीये. 

कारण एनसीआर कॉर्पोरेशनने  (NCR Corporation) पहिल्यांदाच युपीआय आधारीत कार्डलेस पैसे काढणारं एटीएम मशिन तयार केले आहे. एनसीआर कॉर्पोरेशनने  यासाठी सिटी युनियन बँकेसोबत करार केला असल्याचे समजत असून या बँकेने आता 1500 एटीएम (ATM) मशिन क्यूआर (QR) कोड आधारीत मशिन अपडेट करण्यास सांगितले आहे. आणि याबाबत आता अन्य सरकारी बँका आणि खासगी बँकांशी चर्चा करून ही सुविधा उपलब्ध होणार आहे.

कार्डलेस एटीएम (ATM) असे कार्य करेल..

आपल्या मोबाईलमधील यूपीआय ऍप आता  एटीएम कार्डसारखं वापरता येणार असून  त्यावर असणारा क्यूआर QR Code कोड स्कॅन केल्यानंतर पैसे काढता येणार आहे. हि सर्व प्रक्रिया करण्यासाठी आता फक्त सॉफ्टवेअरमध्ये बदल करण्यात येणार असून  कोणतेही हार्डवेअर अपडेट करण्याची गरज नसणार असे एनसीआरचे मॅनेजिंग डायरेक्टर नवरोझ दस्तूर यांनी सांगितले आहे. 

आता एटीएम कार्ड शिवाय बँकेतून पैसे काढणे शक्य होणार असून यासाठी आपल्याला आपला क्यूआर (UPI QR) कोड एटीएमवर स्कॅन करून पैसे काढता येणार असल्याचं सिटी यूनियन बँकेचे मॅनेजिंग डायरेक्टर एन कमाकोडी यांनी माहिती दिली आहे.

अशी असेल एटीएममधून पैसे काढण्याची सोपी पद्धत..

आपल्या मोबाईलमध्ये आपण पेयमेंट ऍप जसे  फोन पे, Phone Pay, पे टीएम Paytm, गुगल पे, GPay यांसारखे अॅप वापरत असतो तेच ऍप आपल्या मोबाईलमध्ये  हवेत. या यूपीआय UPI मधील क्यूआर QR कोड आपण एटीएम मशिनवर स्कॅन करून आपल्या मोबाईलद्वारे पैसे काढता येणार आहेत.

शिवाय हि लॉंच होणारी नवीन सुविधा सुरक्षित असून QR कोडने पैसे काढल्यानंतर काही सेकंदात तो बदलणार असल्याने ग्राहकांची कुठल्याही प्रकारची फसवणूक टळणार आहे.