अख्तर काझी
दौंड : दौंड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक माधव रेशवाड ( वय 54 रा. दौंड) याला दहा हजार रुपयाची लाच घेताना लाचलुचपत विभागाचे पोलीस निरीक्षक वीरनाथ माने यांनी रंगेहात पकडले असल्याची माहिती मिळत आहे. ही कारवाई आत्ता काही वेळापूर्वी करण्यात आली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली सविस्तर माहिती अशी की, संबंधित महसूल सहाय्यक माधव रेशवाड याने घर जप्ती पुढे ढकलण्याकरता फिर्यादीकडून दहा हजार रुपये मागितले होते, तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत विभागाशी संपर्क साधला. आज दि. 30 रोजी रात्री नऊच्या सुमारास दौंड गोपाळ वाडी रोड परिसरातील सरपंच वस्ती येथे याला लाच स्वीकारताना रंगे हाथ पकडले असून सध्या आरोपीला दौंड पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस निरीक्षक विरनाथ माने, पोलीस शिपाई तावरे, दिनेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चव्हाण यांच्या पथकाने केली.