Big News पुण्यात अंशतः लॉकडाउन, कडक निर्बंध लागू! या वेळेत संचारबंदी तर दिवसभर जमावबंदी



पुणे : सहकारनामा

राज्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला असून पुणे यामध्ये अग्रेसर आहे. त्यामुळे हि परिस्थिती पाहता आता सायंकाळी 6 ते सहा पर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली असून याला अंशतः लॉकडाऊन असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.

पुणे शहरात निर्बंध अधिक प्रमाणात कडक करण्यात आले असून याबाबत राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यानंतर  हा अंशतः लॉकडाऊन लागू होणार असल्याची माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

अंशतः लॉकडाउन मध्ये हे असतील कडक निर्बंध..

★ संध्याकाळी 6 ते सकाळी 6 पर्यंत संचारबंदी (अत्यावश्यक सेवा वगळून) तर दिवसा जमावबंदी

★ पुढील 7 दिवस हॉटेल, मॉल्स, बार, सिनेमा हॉल, प्रार्थनास्थळे, आठवडी बाजार, जिम, नाट्यगृह बंद

★ लग्न आणि अंत्यविधी सोडून इतर कार्यक्रमावर पूर्णतः बंदी

★ पार्सल सेवा सुरू  राहणार

★ पीएमपीएल बस सेवा पुर्णतः बंद

★ मंडई, मार्केट यार्ड, शारीरिक अंतर राखून सुरू

★ बागा सकाळच्या वेळेत सुरू राहणार

★ शाळा, कॉलेज 30 एप्रिल पर्यंत बंद

★ दहावी बारावीच्या परीक्षा वेळेत होणार

★ एमपीएससी 10 वी, 12 वी च्या विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही

★ पुढच्या शुक्रवारी या निर्बंधांचा फेरआढावा घेतला जाणार